मुंबई - बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आज जरी ते चित्रपटांपासून दूर असले, तरीही आजही प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बरेच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. अलिकडेच त्यांनी एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी दिलेलं कॅप्शन हे नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे.
दिग्गज अभिनेत्री माला सिन्हा यांच्यासोबतचा हा फोटो धर्मेंद्र यांनी शेअर केला आहे. 'मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी... साहीर की याद में', असे कॅप्शन त्यांनी या फोटोवर दिले आहे. हा फोटो त्यांच्या 'आँखे' या चित्रपटादरम्यानचा आहे. तसेच या ओळीदेखील याच चित्रपटातील गाण्याच्या आहेत. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
Milti hai zindagi main mohabbat kabhi kabhi.....Sahir ki yaad main 🙏 pic.twitter.com/r5t6A7VgfG
— Dharmendra Deol (@aapkadharam) March 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Milti hai zindagi main mohabbat kabhi kabhi.....Sahir ki yaad main 🙏 pic.twitter.com/r5t6A7VgfG
— Dharmendra Deol (@aapkadharam) March 19, 2020Milti hai zindagi main mohabbat kabhi kabhi.....Sahir ki yaad main 🙏 pic.twitter.com/r5t6A7VgfG
— Dharmendra Deol (@aapkadharam) March 19, 2020
धर्मेंद्र आणि माला सिन्हा यांची जोडी एकेकाळी खूप प्रसिद्ध होती. धर्मेंद्र यांनी अर्जुन हिंगोरानी यांच्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून १९६० साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. १९७० च्या दशकात त्यांचा जगातील सर्वात हँडसम पुरुषांच्या यादीत समावेश झाला होता.