दीपिका अभिनीत 'द इंटर्न'च्या रिमेकसाठी ऋषी कपूर यांच्या जागी अभिनेत्याचा शोध जारी - दीपिकाचा ऋषी कपूरसोबत चित्रपट
दीपिका पादुकोणची भूमिका असलेला ‘द इंटर्न’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार असल्याचे वर्षाच्या सुरूवातीस जाहीर झाले होते. मात्र एप्रिलमध्ये ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचे निधन झाले नसते तर हा चित्रपट पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला चित्रपटगृहांमध्ये रिलीजसाठी तयार झाला असता. मूळचा रॉबर डी निरोने निभावलेल्या भूमिकेसाठी ऋषी कपूर यांचा विचार झाला होता. त्यानंतर अजूनही या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरू आहे.
मुंबई - दीपिका पादुकोणची भूमिका असलेल्या ‘इंटर्न’ च्या हिंदी रिमेकसाठी ऋषी कपूर साकारणार असलेली भूमिका करण्यासाठी अद्यापही अभिनेता मिळालेला नाही. मुळ चित्रपटात अभिनेता रॉबर्ट डी निरो यांनी साकारलेली भूमिका ऋषी कपूर करणार होते. आता या भूमिकेसाठी निर्मात्यांनी पुन्हा शोध सुरू केला आहे.
यावर्षीच्या जानेवारी महिन्यात अभिनेता रॉबर्ड डी नीरो आणि अॅनी हॅथवे यांची भूमिका असलेल्या 'द इंटर्न' या चित्रपटाच्या अधिकृत हिंदी रिमेकची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार शुटिंगची तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र एप्रिल महिन्यात ऋषी कपूर यांचे निधन झाल्यामुळे हे शुटिंग रेंगाळले.
दीपिका आणि सनीर खेतरपाल यांनी अनुक्रमे का प्रॉडक्शन आणि अझर एंटरटेनमेंट या बॅनरखाली एकत्रितपणे या चित्रपटाची निर्मिती करायचे ठरवले आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये शुटिंग फ्लोअरवर जाईल.
हेही वाचा - बुद्धीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यावर बनणार बायोपिक
ऋषी कपूर आणि दीपिका पदुकोण ‘द इंटर्न’ या चित्रपटात ११ वर्षानंतर एकत्र काम करणार होते. त्यांनी लव्ह आज कल या चित्रपटात २००९ मध्ये अखेरचे एकत्र काम केले होते.
हेही वाचा - "छोट्याशा प्रेम प्रकरणासाठी कधीपर्यंत रडणार?" : कंगनाचा हृतिकला सवाल