फरीदाबाद - सुशांतसिंह राजपूत याच्या हत्येमागे रिया चक्रवर्तीचा हात असू शकतो, असा खळबळजनक आरोप केंद्रीय सामाजिक न्याय व सहकार राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. आज त्यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांचे वडील आणि बहीण यांची फरीदाबाद येथे जाऊन भेट घेतली. या दरम्यान आठवले म्हणाले की, याप्रकरणी आपण प्रथम सीबीआय चौकशीची मागणी केली होती आणि आज सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे.
रामदास आठवले म्हणाले की, संपूर्ण देश सुशांतच्या कुटुंबासोबत आहे. या प्रकरणात जो आरोपी असेल त्याला फाशी देण्यात यावी. तसेच ज्या लोकांनी सुशांतला जीवे मारले किंवा जबरदस्तीने आत्महत्या केली, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती हिचादेखील हात असू शकतो.
सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर नेते, अभिनेते सुशांतच्या वडिलांना भेटायला सतत फरीदाबादला पोहोचत आहेत. याआधीही हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल फरीदाबादला गेले होते.