पाटणा- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या कथित आत्महत्येचे राजकारण बिनदिक्कत सुरू आहे. बिहारचे मंत्री महेश्वर हजारी यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला कॉन्ट्रॅक्ट किलर आणि एक विषारी सर्प महिला म्हटले आहे.
आत्महत्येच्या मुद्द्यावर संशय व्यक्त करताना मंत्री म्हणाले की, हा आत्महत्येचा नसून खुनाचा प्रकार असल्याचे दिसते. रिया ही केवळ 'सुपारी' (कॉन्ट्रॅक्ट) किलर नसून बॉलीवूडच्या 'विशकन्या'च्या आवृत्तीसारखी होती जिने सुशांतला तिच्या प्रेमात अडकवून ठार मारले.
हजारी म्हणाले की रियाला एका षडयंत्रांतर्गत सुशांतकडे पाठविण्यात आले होते. "आपली महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या मागे लागून किती लोक मरणार हे मला ठाऊक नाही. अशा मारेकऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे," असे मंत्री म्हणाले.
हेही वाचा - रियाच्या याचिकेनंतर सुशांतच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टात दाखल केले 'कॅव्हिएट'
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांकडून अद्यापपर्यंत कोणताही तपास करण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी केला आणि बिहार सरकार उच्चस्तरीय चौकशीवर विचार करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाटणा येथील रहिवासी असलेल्या सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईतील त्यांच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. यानंतर सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया आणि इतरांनी सुशांतकडून फसवणूक केली आणि पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप करत 25 जुलै रोजी पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.