ETV Bharat / sitara

अनुभव सिन्हांच्या 'अनेक'मधील आयुष्मानचा लूक - अनुभूती कश्यप

बॉलिवूड हिट मशीन आयुष्मान खुरानाने मागील महिन्याच्या उत्तरार्धात अनुभव सिन्हाच्या आगामी 'अनेक' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. हा चित्रपट बऱ्याच काळापासून पूर्ण होत आहे. आयुष्मानने या चित्रपटातील आपला लूक चाहत्यांना शेअर केला आहे.

Ayushmann's look
आयुष्मान खुराना
author img

By

Published : Feb 2, 2021, 2:27 PM IST

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानाने मंगळवारी चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा यांच्यासोबत 'अनेक' या नावाच्या दुसर्‍या चित्रपटाची घोषणा केली आहे. २०१९ मध्ये देशातील जातीभेदांभोवती फिरणाऱ्या 'आर्टिकल १५' या चित्रपटात अनुभव सिन्हासोबत गाजलेला चित्रपट बनवला होता.

आयुष्मानने इन्स्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचा लूक प्रसिध्द करताना लिहिले आहे, ''अनुभव सिन्हा सरांसोबत काम करण्यासाठी पुन्हा एकदा उत्सुक झालो आहे. या ठिकाणी 'अनेक' या चित्रपटातील जोशुआ लूक शेअर करीत आहे.''

अनेक या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाले. या चित्रपटाची निर्मिती अनुभव सिन्हा यांच्या बनारस मीडिया वर्क्स आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजने केली आहे.

दरम्यान, आयुष्मानने अलीकडेच त्याच्या आगामी 'चंदीगड करे आशिकी' या चित्रपटाचे शूट पूर्ण केले. अभिषेक कपूर यांनी या प्रेमकथेचे दिग्दर्शन केले आहे आणि महामारीच्या पार्श्वभूमीवर अवघ्या ४८ दिवसांत चंदीगडमध्ये चित्रीकरण झाले होते. आयुष्मान आगामी 'डॉक्टर जी' नावाच्या विनोदी चित्रपटातही भूमिका करणार असून याचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करणार आहे.

हेही वाचा - टायगरच्या आवाजातील ‘कॅसिनोवा’ गाणे रिलीज: चाहत्यांची भरभरुन पसंती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.