ETV Bharat / sitara

'डॉक्टर जी'मध्ये झळकणार आयुष्यमान खुराणा, अनुराग कश्यपचे बहिण करणार दिग्दर्शन - अनुभुती कश्यप

अभिनेता आयुष्मान खुराना आगामी 'डॉक्टर जी' या चित्रपटात कारकिर्दीतील पहिलीच डॉक्टरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून अनुभुती कश्यप बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकिय पदार्पण करणार आहे. आयुष्मानला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन तर करेलच पण चांगला संदेशही देईल.

Ayushmann's next campus comedy
डॉक्टर जी'
author img

By

Published : Dec 22, 2020, 12:49 PM IST

मुंबई - अनुभुती कश्यप आगामी 'डॉक्टर जी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकिय पदार्पण करणार आहे. या चित्रपटात चतुरस्त्र अभिनेता आयुष्यमान खुराणा भूमिका करणार आहे. 'बरेली की बर्फी' आणि 'बधाई हो' या चित्रपटानंतर आयुष्यमानचा 'जंगली पिक्चर्स'सोबतचा हा तिसरा चित्रपट आहे.

आघाडीच्या वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार जंगली पीचर्सच्या पुढच्या प्रॉडक्शनमध्ये आयुष्मान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कॅम्पस कॉमेडी-ड्रामा असलेल्या या नाट्यमय चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करणार आहे. अनुभुती ही प्रसिध्द निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यपची धाकटी बहिण आहे.

वेगळ्या धाटणीचे चौकटी बाहेरील चित्रपट निवडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुष्यमानने 'डॉक्टर जी'ला हिरवा कंदिल दाखवला आहे.राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता आयुष्यमानने एका दैनिकाला सांगितले की 'डॉक्टर जी'ची पटकथा त्याला त्वरीत आवडली कारण ती एकदम ताजी आहे.

आयुष्यमानने सांगितले की 'डॉक्टर जी'ची कहाणी अत्यंत अनोखी आणि नाविन्यपूर्ण आहे, जी प्रेक्षकांना हसवेल आणि विचार करायला भाग पाडेल. आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच डॉक्टरची भूमिका साकारणार असल्याचेही त्याने सांगितले. आयुष्मानला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन तर करेलच पण चांगला संदेशही देईल.

हेही वाचा - 'कुली नंबर १' मधील 'तुझको मिर्ची लगी' गाणे रिलीज

दरम्यान, आयुष्मान अभिषेक कपूरच्या आगामी 'चंदीगड करे आशिकी' या रोमँटिक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तो अ‍ॅथलीटच्या भूमिकेत असून यात वाणी कपूर देखील आहे.

हेही वाचा - बिग बॉस १४: सोनाली फोगटची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.