ETV Bharat / sitara

Aryan Khan attends NCB office : जामिनावर सुटल्यानंतर आर्यन खानने चौथ्यांदा लावली एनसीबी कार्यालयात हजेरी - शाहरुख खानचा मुलगा आर्यन

क्रुझ ड्रग प्रकरणात जामीन देताना आर्यन खान (Aryan Khan) , अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) यांना न्यायालयाने काही अटीवर जामीन दिला होता. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात (Aryan Khan attends NCB office) हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी एनसीबी कार्यालयात आज हजेरी लावली.

आर्यन खान
आर्यन खान
author img

By

Published : Nov 26, 2021, 7:00 PM IST

मुंबई - क्रुझ ड्रग प्रकरणात जामीन देताना आर्यन खान (Aryan Khan) , अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) यांना न्यायालयाने काही अटीवर जामीन दिला होता. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात (Aryan Khan attends NCB office) हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी एनसीबी कार्यालयात आज हजेरी लावली.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या NCB (Central Narcotics Control Department) दिल्लीतील विशेष पथकाने शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan's son Aryan) याचा नवी मुंबईतील एनसीबी कार्यालयात जबाब नोंदवण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर NCB कार्यालयात हजर राहण्याची ही चौथी वेळ आहे. आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा हे सुद्धा आज हजेरी लावायला आले होते.

दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी

क्रुझ ड्रग प्रकरणात जामीन देताना आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनी एनसीबी कार्यालयात आज हजेरी लावली. हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्याला जामिनाचे कागदपत्र सादर करून एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते.

नेमके काय आहे प्रकरण?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला एनसीबीने क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा आहे. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल 27 दिवसानंतर आर्यन खानची 30 ऑक्टोबर रोजी आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली होती. उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.

हेही वाचा - मी शीख समाजाचा आब राखत भूमिका साकारली, ‘सरदार इज किंग’ म्हणाला सलमान खान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.