ETV Bharat / sitara

Chakda Xpress : अनुष्का शर्माची क्रिकेट नेटप्रॅक्टीस, झुलनने दिली प्रतिक्रिया - क्रिकेटर अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माने तिच्या 'चकडा एक्‍सप्रेस' चित्रपटाच्या तयारीतील दोन फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित या बायोपिकसाठी तिने गोलंदाजीचे खास प्रशिक्षण घेतले आहे.

अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा
author img

By

Published : Feb 25, 2022, 5:33 PM IST

मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या कमबॅक चित्रपट 'चकडा एक्सप्रेस'ची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत तिच्या प्रशिक्षणातील अनेक फोटो ऑनलाइन लीक झाले आहेत. परंतु निर्मात्यांनी पोस्टरशिवाय अधिकृत काहीही शेअर केलेले नाही. मोठ्या पडद्यावर भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीची भूमिका साकारण्यासाठी झूलन स्वतः अनुष्काला प्रशिक्षण देत असलेला फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे.

दोन फोटोंच्या सेटमधील पहिल्या फोटोत अनुष्काच्या हाती क्रिकेटचा बॉल दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती बॉलसह गोलंदाजीच्या अॅक्शनमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करीत अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "ग्रिप बाय ग्रिप चकडा एक्सप्रेसची तयारी."

झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का झुलनची भूमिका साकारत आहे. अनुष्काच्या या पोस्टवर झुलनची प्रतिक्रिया आली आहे. झुलनने अनुष्काच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन लिहिले, "खूप छान."

'चकडा एक्सप्रेस' हा बायोपिक चित्रपट जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान महिला वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या झुलनच्या गौरवशाली प्रवासाचा मागोवा घेणार आहे. आपले क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झुलनने अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे. क्रिकेटवर आधारित या चित्रपटाबद्दल बोलताना अनुष्काने आधी सांगितले होते की झुलनचे जीवन खडतर आणि चिकाटीने भरलेले आणि सर्व संकटांचा मजबूत पध्दतीने मुकाबला करणारे आहे. 'चकडा एक्सप्रेस' हा त्यावेळच्या महिला क्रिकेटच्या जगाचा मागोवा घेणारा चित्रपट आहे.

प्रॉसित रॉय दिग्दर्शित 'चकडा एक्सप्रेस'ची निर्मिती अनुष्का आणि तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांच्या क्लीन स्लेट फिल्मस बॅनरच्या वतीने केली जात आहे.

हेही वाचा - पा रंजीथ बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज, बिरसा मुंडा बायोपिकची तयारी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.