ETV Bharat / sitara

'मेडे'मध्ये अमिताभ, अजय देवगणसोबत झळकणार अंगिरा धर - मेडे या थ्रिलर चित्रपटात अमिताभ बच्चन

अभिनेत्री अंगिरा धर आगामी मेडे या थ्रिलर चित्रपटात अमिताभ बच्चनसह स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय देवगण करणार आहे. सुमारे सात वर्षानंतर अमिताभ आणि अजय एकत्र काम करताना दिसतील.

Angira Dhar
अंगिरा धर
author img

By

Published : Dec 4, 2020, 9:26 PM IST

मुंबई - अभिनेत्री अंगिरा धर अमिताभ बच्चन, अजय देवगन आणि रकुल प्रीत सारख्या कलाकारांसह आगामी 'मेडे' या थ्रीलर चित्रपटाच्या कास्टमध्ये सामील झाली आहे. चित्रपटात अंगिरा एक वकील म्हणून दिसणार आहे. अंगिरा यापूर्वी 'कमांडो 3' मध्ये दिसली होती.

या बद्दल बोलताना अंगिरा म्हणाली, "अमिताभ सर आणि अजय सरांसारख्या आमच्या चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह स्क्रीन शेअर करण्यास मला खरोखर आनंद झाला आहे आणि मी उत्साही आहे. हा एक अतिशय उल्लेखनीय प्रवास ठरणार आहे. अजय देवगण यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची जास्त प्रतीक्षा करू शकत नाही."

हेही वाचा -वरुण धवन, नीतू कपूर, दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाबाधा

'मेडे' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगण करीत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अजय देवगण जवळपास सात वर्षानंतर एकमेकांसोबत काम करणार आहेत. दोघांना अखेर ऑगस्ट २०१३ मध्ये 'सत्याग्रह' या चित्रपटात एकत्र पाहिले होते.

अजय देवगण या चित्रपटात पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे आणि रकुल त्याच्या सह-पायलटच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती सूत्रांने दिली आहे. बिग बीच्या व्यक्तिरेखेबद्दल अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही.

हेही वाचा -'दरबान'मधील शरिब हाश्मीची भूमिका पाहून उत्तम कुमारशी होतेय तुलना

चित्रपटाचे शूटिंग या महिन्यापासून हैदराबादमध्ये सुरू होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.