मुंबई - अभिनेत्री अनन्या पांडेने आतापर्यंत तीनच चित्रपट केलेत. ‘स्टुडन्ट ऑफ द ईयर २’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनन्याने ‘पती पत्नी और वो’ मधून आपल्या नैसर्गिक अभिनयाची चुणूक दाखविली होती. गेल्या वर्षी फार कमी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले त्यात अनन्याचा नंबर लागतो. तिचा ईशान खट्टर सोबतचा ‘खाली पिली’ हा चित्रपट डिजिटली प्रदर्शित झाला व त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्सही मिळाला. ती विजय देवेरकोंडासोबत एका चित्रपटात काम करतेय, जो पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘लायगर’ असे नाव असलेल्या चित्रपटाची प्रदर्शन तारीख नुकतीच घोषित करण्यात आली. ९ सप्टेंबर २०२१ ला तो जगभरात रिलीज होणार आहे.
विजय देवराकोंडाने स्तुती करताच 'लाजली' अनन्या पांडे!! - अनन्या स्वतःला भाग्यवान मुलगी समजते
लायगर या आगामी चित्रपटात अनन्या पांडे दाक्षिणात्य हिरो विजय देवराकोंडासोबत काम करीत आहे. ती सुंदर आहे, खूप मेहनती आहे आणि खरोखर मनापासून काम करते, असे म्हणत विजयने तिचे कौतुक करताच अनन्या पांडे खूप लाजली.