ETV Bharat / sitara

'चेहरे'मध्ये अमिताभ बच्चनचा 8 मिनीटांचा डायलॉग, ‘वन-टेक’ शुट करुन 'बिग बी' यांनी केला विक्रम - Big B set a record by shooting 'One-Tech'

अमिताभ बच्चन यांनी ‘चेहरे’ चित्रपटात तब्बल ८ मिनिटांचा ‘मोनोलॉग’ बोलला आहे, अखंडपणे, एका टेकमध्ये आणि नवीन विश्व-रेकॉर्ड प्रथापित केलाय. या स्वगताची म्हणजेच मोनोलॉगची विशेषता म्हणजे हा ८ मिनिटांचा संवाद स्वतः अमिताभ बच्चन यांच्या लेखणीतून अवतरला असून या दृश्याचे चित्रण एका टेक मध्ये झाले आहे.

'चेहरे'मध्ये अमिताभ बच्चनचा 8 मिनीटांचा डायलॉग

author img

By

Published : Aug 28, 2021, 3:10 PM IST

पूर्वी ‘क्या डायलॉग मारा’ हे वाक्य प्रेक्षकांच्या तोंडून आलं की पिक्चर हिट असे, तसेच ती डायलॉगबाजी करणारा नट सुद्धा. हिंदी सिनेमा आणि डायलॉगबाजी यांचा खूप जुना संबंध आहे. पूर्वीच्याकाळी देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार, राज कुमार, शत्रुघ्न सिन्हा सारखे अनेक कलाकार त्यांच्या खास डायलॉग बोलण्याच्या शैलीमुळे फेमस होते. या यादीत अमिताभ बच्चनचे नाव अगदी वर असेल. त्याचा भारदस्त आवाज, डायलॉग बोलण्याची पद्धत आणि त्याची पर्सनॅलिटी यामुळे त्याच्या तोंडून बाहेर पडणारे साधे संवादही ‘डायलॉग्स’ वाटायचे, किंबहुना वाटतात.

'चेहरे'मध्ये अमिताभ बच्चनचा 8 मिनीटांचा डायलॉग
'चेहरे'मध्ये अमिताभ बच्चनचा 8 मिनीटांचा डायलॉग

आता हेच बघाना, अमिताभ बच्चन अभिनित ‘चेहरे’ चित्रपट (महाराष्ट्र आणि इतर काही राज्ये वगळता) चित्रपटगृहांमध्ये नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटातील संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताहेत, खासकरून बिग बीचे डायलॉग्स. इम्रान हाश्मी, अन्नू कपूर, ध्रीतिमान चॅटर्जी, रघुवीर यादव, सिद्धांत कपूर, रिया चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘चेहरे’ मध्ये कोर्टरूम ड्रामा रंगविण्यात आला आहे. साहजिकच अशा कथेत संवादांना महत्व जास्त असते जे या चित्रटातूनही दिसून येते. डायलॉगबाजीमध्ये माहीर असलेल्या अमिताभ बच्चन यांनी यावेळेस एका विक्रमला गवसणी घातली आहे.

‘चक दे इंडिया’ मध्ये शाहरुख खान, ‘दामिनी’ मध्ये सनी देओल, ‘क्रांतिवीर’ मध्ये नाना पाटेकर, अर्शद वर्षी व अक्षय कुमार यांचे अनुक्रमे ‘जॉली एल एल बी १ आणि २’ मध्ये, ‘अ वेन्सडे’ मध्ये नासिरुद्दीन शाह या कलाकारांनी काही मिनिटांची स्वगतं प्रेक्षकांसमोर पेश केली होती. बिग बी यांनी सुद्धा ‘पिंक’ मध्ये मोठा डायलॉग लीलया पेश केला होता. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘प्यार का पंचनामा, मधील ७ मिनिटांच्या ‘मोनोलॉग’ ने, जो एक विक्रम होता, कार्तिक आर्यन चित्रपटसृष्टीत ओळखला जाऊ लागला. परंतु आता अमिताभ बच्चन यांनी ‘चेहरे’ चित्रपटात तब्बल ८ मिनिटांचा ‘मोनोलॉग’ बोलला आहे, अखंडपणे, एका टेकमध्ये आणि नवीन विश्व-रेकॉर्ड प्रथापित केलाय.

या स्वगताची म्हणजेच मोनोलॉगची विशेषता म्हणजे हा ८ मिनिटांचा संवाद स्वतः अमिताभ बच्चन यांच्या लेखणीतून अवतरला असून या दृश्याचे चित्रण एका टेक मध्ये झाले आहे. भारतातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर हा भलामोठा संवाद लिहिलेला असून, त्यांना न्याय मिळत नाही वा उशिरा मिळतो यावर टिपण्णी करण्यात आली आहे. चित्रपटात हे दृश्य बघताना प्रेक्षकांच्या अंगावर नक्कीच काटा येईल आणि अमिताभ बच्चन यांनी तो दीर्घसंवाद ज्या पद्धतीने बोलला आहे त्याला तोड नाही.

बिग बी यांच्या मोनोलॉगवर निर्माते आनंद पंडित म्हणाले, "’चेहरे’ मधील बिग बी यांचा ८ मिनिटांचा संवाद खरोखरच अनोखा आहे. कुठल्याही सिनेमात, अगदी जगातील कुठल्याही चित्रपटात, जगातील कुठल्याही अभिनेत्याने वा अभिनेत्रीने एकाच संबंधित विषयावर इतका मोठा संवाद, तोही ‘वन-टेक’ मध्ये बोलला नाहीये. इथे नमूद करणे आवश्यक आहे की ही अमिताभ सरांची कल्पना होती. त्यांचे म्हणणे होते की, चित्रपटात असलेला बलात्कार आणि महिलांच्या सुरक्षेवरील हा संवाद जागतिक स्तरावर जनजागृती करू शकेल आणि ते बरोबर होते यांचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.’

‘चेहरे’ मधील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडणारा अमिताभ बच्चन यांचा मोनोलॉग सर्वांना प्रभावित करणारा असून आता त्याचा व्हिडिओ महिलांच्या सुरक्षेसाठी वापरला जाणार आहे ही अभिमानाची बाब आहे.

हेही वाचा - हनी सिंग सुनावणीदरम्यान अनुपस्थितीत; न्यायालयाने फटकारलं...'कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.