ETV Bharat / sitara

'सडक २'च्या चित्रीकरणाला सुरूवात; आलियाने शेअर केली भावनिक पोस्ट - sanjay dutta

'सडक २'मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहे.शनिवारी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून आलियाने भावनिक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. आलियाने महेश भट्ट यांच्या हातात असलेल्या क्लॅपचा फोटो शेअर केला.

'सडक २'च्या चित्रीकरणाला सुरूवात
author img

By

Published : May 19, 2019, 12:19 PM IST

मुंबई - एकेकाळी बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या 'सडक' चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९१ मध्ये आलेल्या सडक चित्रपटात प्रेक्षकांना पुजा भट्ट आणि संजय दत्तची जोडी पाहायला मिळाली होती. आता 'सडक २'मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर तिच्या अपोझिट आदित्य रॉय कपूर असणार आहे.

चित्रपटाच्या सिक्वलमध्ये पुजा भट्ट आणि संजय दत्तच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत. शनिवारी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून आलियाने भावनिक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. आलियाने महेश भट्ट यांच्या हातात असलेल्या क्लॅपचा फोटो शेअर केला. हे माझे वडील आहेत जे सध्या माझ्या चित्रपटाचे दिग्दर्शकही आहेत. या चित्रपटासाठी काम करताना एक लहान उंदीर सुंदर, भावनात्मक आणि प्रचंड मोठा डोंगर चढत असल्यासारखं वाटत असल्याचं तिनं म्हटलं आहे.

मी हा डोंगर चढून वरती पोहोचेल अशी मला अपेक्षा आहे. मात्र, तो पार करताना मी पडले तरीही पुन्हा उठून नव्याने चालायला सुरूवात नक्की करेल. हा एक कठीण टप्पा असला तरीही जेवढं मी ऐकलं आणि पाहिलं आहे त्यावरून प्रत्येक चुकीच्या पावलाचेही मुल्य असते, असे म्हणत तिने चित्रीकरणाला सुरूवात करणार असल्याचे सांगितले आहे.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.