मुंबई - पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने भारताला प्रत्युत्तर देण्याच्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली होती. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे नाकारत त्यांनी उलट भारतावरच निशाणा साधला होता. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास आम्ही प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला होता.
What a speech! @ImranKhanPTI
— Ali Zafar (@AliZafarsays) February 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">What a speech! @ImranKhanPTI
— Ali Zafar (@AliZafarsays) February 19, 2019What a speech! @ImranKhanPTI
— Ali Zafar (@AliZafarsays) February 19, 2019
'व्हॉट अ स्पीच' असे ट्विट करत अलीने इम्रान खान यांच्या या वक्तव्याचे कौतुक केले आहे. अलीने आतापर्यंत 'लंडन पॅरिस न्यूयॉर्क', 'तेरे बिन लादेन' आणि 'मेरे ब्रदर की दुल्हन'सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत आणि गाणीदेखील गायली आहेत. मात्र, असे असतानाही त्याने इम्रान खान यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे चाहते दुखावले असून अली सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकार, गायक यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. टी-सीरिजने यानंतर अतिफ अस्लम आणि राहत फतेह अली खान यासारख्या प्रसिद्ध गायकांची गाणीदेखील आपल्या साईटवरुन हटवली आहेत.