ETV Bharat / sitara

पाकिस्तानी अभिनेता अली जफरने सुशांतसाठी लिहिली भावूक पोस्ट

सुशांतसिंह राजपूतच्या मत्यूने सिने सिताऱ्यांना खोलवर धक्का बसला आहे. अनेक सेलेब्स या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. यात अभिनेता अली जफरचे नावही सामील आहे. सुशांतच्या आठवणीत अलीने एक फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'सुशांतच्या निधनाने मी अजून सावरलेलो नाही.'

author img

By

Published : Jun 24, 2020, 6:52 PM IST

पाकिस्तानी अभिनेता अली जफरने सुशांतसाठी लिही भावूक पोस्ट
अली जफरने सुशांतसाठी लिही भावूक पोस्ट

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाने संपूर्ण देश दुःखी झाला आहे. सुशांतचे असे अचानक न सांगता निघून जाणे सगळ्यांना मनाला लागले आहे. यातून अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटीजनी खोलवर शोक व्यक्त केला. केवळ भारतात नाही तर जगाच्या वेगवेगळ्या भागातूनही निधनानंतर तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अशात पाकिस्तानी गायक अभिनेता अली जफर याने आपल्या इन्स्टाग्रामवर सुशांतचा फोटो शेअर करीत त्याची आठवण जागवली आहे.

अली फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''हा फोटो शेअर केल्याबद्दल शबीना तुझे आभार. मला ही रात्र चांगल्या प्रकारे आठवते. तो बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात शालीन आणि चांगला व्यक्ती होता. तो नेहमी हसमुख राहात होता. मी अजून त्याच्या मृत्यूने सावरलेलो नाहीय.''

हेही वाचा - ...तर तो व्हीडिओ सोशल मीडियावर टाकेन, सोनू निगमची भूषण कुमारला धमकी

या फोटोमध्ये सुशांत आणि अली जफरसोबत सुशांतची मैत्रीण रोहिणी अय्यरही दिसत आहे. सुशांतच्या निधनानंतर रोहिणीनेही त्याच्यासोबतचा फोटो शेअर करीत शोक व्यक्त केला होता. याशिवाय या फोटोत शबीनाही दिसत आहे.

सुशांतसिंह १४ जून रोजी वांद्रे येथील घरात मृत सापडला होता. या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करीत आहेत. त्याच्या जवळच्या लोकांकडे चौकशीही करीत आहेत.

कामाचा विचार करता अली जफरने बॉलिवूडमधील अनेक सिनेमातून काम केले होते. 'किल दिल', 'मेरे ब्रदर की दुल्हन,' 'चश्मे बद्दूर', 'डियर जिंदगी', 'तेरे बिन लादेन', 'टोटल सियापा' आणि 'लंदन पॅरिस न्यूयॉर्क' या चित्रपटातून अली झळकला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.