मुंबई - अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच अनुपम खेर आणि गुलशन ग्रोवर यांच्यासोबतचा आपला फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोमध्ये अक्षयने जमीनीवर बसून अनुपम आणि गुलशन ग्रोवर यांच्या गळ्यात हात टाकला आहे. तर या फोटोला त्याने खास कॅप्शनही दिले आहे.
चित्रपटसृष्टीतील करिअरला मी याच दोघांसोबत सुरूवात केली आणि आजही त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव तितकाच खास आहे. आम्ही एकत्र हसतो, एकमेकांना मारतो आणि एकत्रच मोठेही होतो, असे हे सुंदर व्यक्ती ज्यांना मी मित्र म्हणतो, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
अक्षयच्या या ट्विटवर अनुपम यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या तुझ्याबद्दलच्या भावना सारख्याच आहेत अक्षय. आतापर्यंतचा तुझ्यासोबत केलेला प्रवास नेहमीच खास राहिला. तुझी कामाप्रती असणारी निष्ठा आणि तू मिळवलेल्या यशाबद्दल अभिमान वाटतो, असे म्हणत त्यांनी अक्षयचे कौतुक केले आहे. दरम्यान अक्षयने अनुपम आणि गुलशन ग्रोवर यांच्यासोबत सुरूवातीच्या दिवसांत काम केले होते. तर काही वर्षांपूर्वीच आलेल्या 'बेबी', 'नाम शबाना' आणि 'स्पेशल २६' सारख्या चित्रपटांतही अक्षयने अनुपम खेर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे.