मुंबई - अभिनेता अजय देवगणने शनिवारी जाहीर केले की त्याचा आगामी चित्रपट 'मैदान' येत्या १५ ऑक्टोबर २०२१ रोजी दसऱ्याच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. हा चित्रपट सय्यद अब्दुल रहीम यांच्या आयुष्यापासून प्रेरित आहे. रहिम हे भारतीय संघाचे फुटबॉल प्रशिक्षक होते. १९५० ते १९६३मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते फुटबॉल प्रशिक्षक आणि भारतीय राष्ट्रीय संघाचे व्यवस्थापक होते.
अजय देवगणने चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले होते. त्याने ट्वीट करून लिहिले, "'मैदान' २०२१ च्या दसर्याला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शूटिंग जानेवारीत सुरू होणार आहे."
मैदानचे काही शुटिंग पूर्ण
चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला होणार असले तरीही या आधी लखनौ, कोलकाता आणि मुंबई येथे काही भागाचे शुटिंग पार पडले आहे. चित्रपटाचे शूटींगचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून त्याचे अंतिम शेड्यूल एप्रिलपर्यंत पूर्ण होईल.
हेही वाचा - वाढदिवस विशेष : जेजुरीचा 'खंडोबा' आहे रजनीकांतचे कुलदैवत
या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित रवींद्रनाथ शर्मा आहेत, ज्यात प्रियमणी, गजराज राव आणि रुद्रनील घोष यांच्यासारखे कलाकार आहेत.
हेही वाचा - सुपरस्टार रजनीकांत यांचा 70 वा वाढदिवस ; शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर चाहत्यांची गर्दी