मुंबई - एखादी वाईट गोष्ट होण्यापासून राहिली तर शहरी लोक आंग्ल भाषेचा आधार घेत म्हणतात, ‘थँक गॉड, ते घडले नाही’. खरंतर आपण सर्वच जण कुठल्या ना कुठल्या कारणासाठी देवाचे आभार मनात असतो. असो. आता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंग सोबत म्हणतोय ‘थँक गॉड‘. त्याचे कारण असे की ‘थँक गॉड‘ हे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव असून त्याचे शूटिंग सुरु झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांचे असून साधारण वर्षभराच्या दिरंगाईने शूटिंग सुरु होत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात ‘थँक गॉड‘ चे चित्रीकरण सूर होणार होते परंतु जगभरात कोरोनाच्या पडलेल्या विळख्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले होते.
गेल्यावर्षीपेक्षा आता परिस्थिती थोडीफार सुधारली असून ‘थँक गॉड‘ च्या टीमने प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळत चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. ‘न्यू नॉर्मल’ मध्ये शूटिंग करणे आता कलाकारांच्या अंगवळणी पडत चालले असून तेसुद्धा योग्य काळजी घेत चित्रीकरण करीत आहेत. एक छोटेखानी मुहूर्त करून ‘थँक गॉड‘ च्या टीमने नारळ वाढवला.
![‘थँक गॉड’ चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-ajay-devgn-sidharth-malhotra-rakul-preet-singh-mhc10001_21012021202134_2101f_1611240694_193.jpeg)