मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मालमत्तांवर छापेमारीचे सत्र सुरूच आहे. या प्रकरणात आयकर विभागाने मुंबई, पुणे, दिल्ली आणि हैदराबाद येथे शोधमोहीम राबविली. शुक्रवारी रात्री पुण्यात तापसी आणि अनुराग यांची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. आता या संपूर्ण प्रकरणात पहिल्यांदाच अभिनेत्री तापसी पन्नूने मौन सोडले आहे. दरम्यान, यावर प्रत्युत्तर देत अभिनेत्री कंपना राणावतने रिंगमास्टर कुठे आहेत, असे विचारले आहे.
तापसीच्या ट्विटवर प्रत्युत्तर देताना कंपना म्हणाली, की २०१३ मध्ये तिच्या सर्व रेपिस्ट रिंगमास्टर्सवर धाड टाकण्यात आली होती. केंद्रीय अर्थमंत्र्यांची त्यांचा स्पष्ट संदर्भ दिला आहे. फॅंटम आणि क्वानच्या गॅंगने अनेक महिलांवर बलात्कार केले आहेत. तरीही ही माकड सस्ता तमाशा करत आहे. ते रिंग मास्टर कुठे आहेत...?
तापसी पन्नूने सलग तीन टि्वट केले आहेत. पहिल्या टि्वटमध्ये तापसीने म्हटले, की आतापर्यंत मुख्यत: तीन गोष्टींवर सखोल चौकशी करण्यात आलीय. पॅरिसमध्ये असलेल्या तथाकथित बंगल्याची चावी माझ्याकडे असून तो माझ्या मालकीचा आहे. त्या बंगल्यावर मी उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवते, असा दावा करण्यात येतोय. मात्र, आपल्या नावावर कोणताही बंगला नसल्याचे तीने सांगितले.
तर दुसऱ्या टि्वटमध्ये तापसीने पाच कोटींच्या कथित पावतीवर प्रकाश टाकला. पाच कोटीची पावती माझ्याकडे असून ते पैसे मी भविष्यासाठी ठेवले आहेत, असे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र, पाच कोटींची कोणतीही पावती आपल्याजवळ नसल्याचे तीने म्हटलं.
हेही वाचा - तापसी पन्नू, चित्रपट निर्माते अनुराग कष्यप आणि विकास बहल यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे
माननीय अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2013 मध्ये माझ्या घरी छापे पडले होते. मात्र, तसे नाही, असे तीने तिसऱ्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. याचबरोबर नॉट सो सस्ती एनीमोर(आता अजुन स्वस्त नाही) असेही तीने म्हटलं आहे. 'स्वस्त कॉपी' असा तापसीचा उल्लेख कंगनाने अनेकदा केला आहे.
हेही वाचा - अनुराग-तापसी रडारवर; आयकर विभागाकडून २८ ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू
निर्मला सीतारमण यांची प्रतिक्रिया -
वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या घरांवर आणि कार्यालयावर केलेल्या छाप्यांवर प्रतिक्रिया दिली. 2013 मध्ये या लोकांवर अशीच कारवाई करण्यात आली होती. मात्र, या गोष्टीवर इतकी चर्चा करण्यात आली नाही. तर मग आता का. भाजपा सरकारच्या कार्यकाळात अशी कारवाई केली जाते, तेव्हा त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, असे त्या म्हणाल्या होत्या.
28 ठिकाणी हे धाडसत्र
मुंबई, पुणे, हैदराबाद आणि दिल्ली या चार शहरांमधील एकूण 28 ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. या चौकशीमध्ये या दोघांशी संबंधीत मीडिया प्रोडक्शन कंपनीला सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर जितका फायदा झाला त्यापैकी 300 कोटी रुपयांचा हिशोब देण्यात हे दोघे असमर्थ ठरल्याचे आयकर विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्याचबरोबर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतींमधे आणि त्यांच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये 350 कोटी रुपयांची अनियमितता आढळून आल्याचेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. त्याचबरोबर तापसी पन्नूच्या घरातून पाच कोटी रुपयांच्या रोख रकमेची पावती देखील सापडली आहे. या दोघांच्या कंपन्यांनी दाखवलेल्या खर्चापैकी वीस कोटी रुपयांचा खर्च हा बोगस आढळून आला, असेही आयकर विभागाने म्हटले आहे. दोघांकडून आणि त्यांच्या कार्यालयातुन ई मेल, व्हॉट्सअॅप आणि लॅपटॉप - कॉप्युटर्सच्या हार्ड डिस्कमधुन मोठ्या प्रमाणात डेटा देखील ताब्यात घेण्यात आला आहे. या दोघांची सात बॅंक लॉकर्स देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत.
हेही वाचा - अनुराग कश्यपची प्राप्तिकर विभागाकडून ११ तास चौकशी; लॅपटॉपसह कागदपत्रे जप्त