मुंबई - आयुष्याची खरी मजा मन म्हणेल ते करण्यात असते, ही संकल्पना अनेक चित्रपटांतून मांडण्यात आली आहे. मात्र, ही संकल्पना प्रत्यक्षात जगायला शिकवली ती जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटानं. प्रेक्षकांना आयुष्याची मजा घेण्यास भाग पाडणाऱ्या या चित्रपटाला आज ८ वर्ष पूर्ण झाले आहेत.
चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, अभय देओल, कॅटरिना कैफ आणि कलकी यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटाला आठ वर्ष पूर्ण झाल्याच औचित्य साधत अभय देओलनं खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने या चित्रपटाचा लोकांच्या आयुष्यात झालेला परिणाम सांगितला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटाला आठ वर्ष पूर्ण झाली. हा एक असा चित्रपट आहे, जो पाहिल्यानंतर अनेकजण माझ्याकडे आले आणि म्हणाले, मी हा चित्रपट पाहिला आणि नोकरी सोडली. हा सिनेमा पाहिला आणि जुन्या मित्रांना भेटायला गेलो. कामातून विश्रांती घेतली, घटस्फोट घेतला आणि बरंच काही. या चित्रपटाने लोकांना त्यांची स्वप्न जगायला शिकवलं. आपण कुठे आणि काय आहोत, हे स्वीकारायला शिकवलं. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकत नाही. तुम्हा सर्वांसोबत काम करणं खास होतं, असं म्हणत अभयनं दिग्दर्शक जोया अख्तरचे आभार मानले आहेत.