मुंबई - सध्या देशभर लॉकडाीऊन सुरू आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार या क्वारंटाईनच्या काळात आपला छंद जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. अभिनेता अभय देओलला पेंटिंग बनवण्याचा छंद आहे. त्याने आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे एक चित्र रेखाटले आहे.
अभयने बनवलेल्या पेंटिंगच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''ड्रॉईंग करण्याचा परत एकदा प्रयत्न केलाय. लोकांची फार मदत करु शकत नाही. परंतु त्यांचे पेंटिंग बनवू शकतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
''आनंदी विषयावर पेंटिंग बनवण्याचा प्रयत्न खरेतर मी केला पाहिजे. परंतु देशातील लोक महामारीच्या या काळात द्वेश पसरवू लागले आहे. जिथे स्वतः मीडियाच पक्षपाती आणि विभाजनकरणारा आहे. अशावेळी ही महिला उपयुक्त आहे असे मला वाटते.''