मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान त्याच्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात करणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शित आगामी पहिल्या चित्रपटात जुनैद 'अर्जुन रेड्डी' फेम अभिनेत्री शालिनी पांडेसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
यशराज फिल्म्स या बॅनरखाली जुनैदचे बॉलिवूड पदार्पण होणार आहे. यापूर्वी अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, परिणीती चोप्रा, दिवंगत सुशांतसिंह राजपूत यांच्यासह असंख्य कलाकारांनी यशराज फिल्ममधूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यशराजने जुनैदसाठी शालिनी पांडेची नायिका म्हणून निश्चित केले आहे.
या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. मात्र जुनैद आणि शालिनी या कलाकारांची निवड निश्चित करण्यात आली असून शालिनीचा हा यशराज फिल्म्ससोबतचा दुसरा चित्रपट आहे. जयेशभाई जोरदार चित्रपटामध्ये रणवीर सिंगच्या विरुद्ध ती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असून या चित्रपटाला बॅनरनेही हिरवा कंदिल दाखवला आहे. शालिनीशिवाय या चित्रपटात यशराजच्या 'बंटी और बबली 2' मध्ये पदार्पण करणारी शर्वरी वाघही झळकणार आहे.
हेही वाचा - एकता कपूर १०० प्रेरणादायी लीडर्सच्या यादीत समाविष्ठ
जुनैद खान याने भारतात रंगभूमीवर ३ वर्षे काम केले आहे. त्यापूर्वी तो लॉस एंजेलिसच्या ‘अमेरिकन अॅकॅडमी ऑफ ड्रामाटिक आर्ट्स’ मध्ये गेला होता. यापूर्वी त्याची मल्याळम चित्रपट इश्कच्या ऑडिशन झाली होती, मात्र यात तो सिलेक्ट झाला नव्हता. त्यानंतर त्याने अनेक कास्टींग डायरेक्टरचे उंबरे झिलवले. अखेर यशराज फिल्म्सचा दरावाजा त्याच्यासाठी उघडा झाला आहे.
जुनैद हा आमिरची पहिली पत्नी रिना दत्ता हिचा मुलगा आहे. त्याला इरा नावाची एक मुलगीही आहे. १६ वर्षे संसार केल्यानंतर आमिर आणि रिना यांच्यात २००२ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर २००५ मध्ये आमिरने किरण रावसोबत लग्न केले.
हेही वाचा - २०२० : बिग बी, बिग बॉस आणि दिल बेचारा यावर केले गेले सर्वाधिक ट्विट