ETV Bharat / sitara

शोलेची ४५ वर्षे : रमेश सिप्पींनी उलगडला क्लासिक चित्रपट निर्मितीचा अद्भूत प्रवास - अमजद खान

शोले या हिंदीमधील चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटाला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही कथा त्यांच्याकडे कशी आली, याची जडण घडन, कास्टींग आणि इतर असंख्य गोष्टींवर दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सविस्तर खुलासा केलाय. ४५ वर्षानंतरही नव्या पिढीला या चित्रपटाची भुरळ पडते. शोले चित्रपटाच्या कथे पासून रिलीजपर्यंतचा अद्भूत प्रवास सिप्पी यांनी यानिमित्ताने सांगितला आहे

45 years of Sholay
शोलेची ४५ वर्षे
author img

By

Published : Aug 15, 2020, 6:17 PM IST

Updated : Aug 15, 2020, 6:57 PM IST

मुंबई - शोले या चित्रपटाची कथा ही सुडाभोवती गुंफण्यात आली होती. सुरुवातीला यात जय, वीर आणि ठाकूर या मुख्य व्यक्तीरेखा सैन्याची पार्श्वभूमी असलेल्या ठरवण्यात आल्या होत्या आणि याचा शेवटही वेगळा होता. ४५ वर्षानंतर विचार करताना चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी कधीही कल्पना केली नव्हती की अशा प्रकारे हा चित्रपट बनेल.

अंदाज आणि सीता और गीता केल्यानंतर, सिप्पी यांना अॅक्शन प्रकार हाताळण्याची इच्छा होती आणि हॉलिवूड वेस्टर्नसारखे चित्रपट बनवायचे होते.

नशिबाने याच काळात प्रसिद्ध लेखक जोडी सलीम खान- जावेद अख्तर यांनी त्यांना शोलेची कथा ऐकवली. ही कथा करण्यास मनमोहन देसाई आणि बहुधा प्रकाश मेहरा यांनी नकार दिला होता.

सिप्पी यांनी सांगितले की, या कथेमध्ये भयानक दरोडेखोर गावात दहशत निर्माण करतात आणि ठाकुरच्या कुटुंबाची हत्या करतात. पळून आलेले दोन तरुण ठाकुरला बदला घेण्यासाठी मदत करतात या मुळ संकल्पनेवर ते ठाम राहिले.

चित्रपटाच्या व्यक्तीरेखा, त्यांचे रंग नंतर अस्तित्वात आले परंतु मुळ कथानंक त्याच्याजागी होते. मात्र, मुळ कथेत दोन तरुण (जय आणि वीरु) हे सैन्यातील होते आणि संजीव कुमारने साकारलेला ठाकुर हा सैन्य अधिकारी होता, असे सिप्पी म्हणाले.

"मूळ कल्पना दोन तरुणांबद्दल (जय आणि वीरू) होती, त्यांचे साहसावरील प्रेम आणि ते ठाकूरच्या या भावनिक कथेत कसे सामील होतात याविषयी होते. सर्व पात्रे एकामागून एक तयार झाली. आम्ही केलेल्या चर्चेनंतर ही पात्रे जीवंत होत गेली आणि आम्ही नंतर स्क्रिप्टकडे वळलो, असे ते म्हणाले.

हेही वाचा - सुशांत आणि रियाने एकमेकांवर खर्च केला, दोघांमध्ये मोठा व्यवहार झाला नाहीः ईडी

स्क्रिप्टिंग आणि कास्टिंगसह शोले तयार करण्याच्या प्रवासाला दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. 3 ऑक्टोबर 1973 पासून या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आणि 15 ऑगस्ट 1975 रोजी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट झळकला.

त्यांच्या हातात एक चांगला चित्रपट होता हे त्यांना माहित होते, असे दिग्दर्शकाने सांगितले.

"आम्हाला वाटले होते की आपण एक चांगला चित्रपट बनवित आहोत, पण 45 वर्षांनंतरही आपण याबद्दल बोलणार आहोत असे नाही. प्रत्येकाने आपले सर्वोत्तम पाऊल पुढे टाकला. परंतु आम्ही या गोष्टीची (प्रेमाची आणि अनुसरण करण्याची) अपेक्षा केली नव्हती'', असे ते म्हणाले.

शोले देखील त्या दुर्मीळ गोष्टींपैकी एक होता, जिथे कास्टिंग प्रक्रियेदरम्यानही खलनायक गब्बरसिंगचे पात्र सर्वात मोठे आकर्षण होते.

सिप्पी म्हणाले की, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन आणि संजीव कुमार या चित्रपटाचे मुख्य कलाकार, आपली भूमिका साकारण्याची तयारी दर्शवत होते आणि ते आपल्या नायकाच्या प्रतिमेचा त्याग करण्यास तयार होते. गब्बरच्या भूमिकेसाठी डॅनी डेन्झोंगपा यांची निवड करण्यात आली परंतु फिरोज खान यांच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटासाठी ते करारबद्ध असल्यामुळे त्यांनी ही भूमिका सोडली आणि आम्हाला अमजद खानमध्ये गब्बर सापडला. सलीम-जावेद यांनीच या भूमिकेसाठी अमजद खानचे नाव सुचवले.

''मला आठवते की अमजद खान याला नाटकात जबरदस्त काम करताना पाहिले होते, माझी बहिण त्या नाटकात काम करीत होती'', सिप्पी यांनी आठवत सांगितले.

त्याचा चेहरा, अंगभूत, व्यक्तिमत्त्व, आवाज सर्वकाही योग्य वाटले. आम्ही त्याला दाढी वाढवायला सांगितलं, वेशभूषा करून घेतलं, फोटो काढला आणि तो खडबडीत माणूस भूमिकेसाठी योग्या वाटायला लागला."असं ते पुढे म्हणाले. अमजद खान यांनी चंबळ डाकूंवर आधारित अभिश्प्थ चंबळ हे पुस्तक वाचून त्या भागाची तयारी केली.

हेही वाचा - कॅलिफोर्निया राज्य विधानसभेने सुशांतसिंहचा भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल केला गौरव

शोले बनवणे हा एक दीर्घ आणि कठीण प्रवास होता परंतु तो दिग्दर्शकासाठी फायदेशीर होता.

"हे एक कठीण आणि प्रयत्न करणारे (शूट) होते. जवळजवळ ५०० दिवस शूटिंग सुरू होते आणि आमच्याकडे व्हीएफएक्सची आणि आज विकसित झालेल्या सर्व तंत्रज्ञानाची सोय नव्हती. आम्ही जे काही प्रयत्न करता येईल तितके उत्कृष्ट प्रयत्न केले. हा एक संघर्ष होता," असे ते म्हणाले.

इतर पात्रांचे कास्ट करणे ही तितकीच मनोरंजक कहाणी आहे. "सीता और गीता" मध्ये धर्मेंद्र, संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्यासारख्या कलाकारांसोबत काम केल्यानंतर सिप्पी म्हणाले की, "शोले" मध्ये तिघांसोबत काम करण्यास ते उत्सुक होते.

धर्मेंद्र यांना ठाकूरची भूमिका साकारण्याची इच्छा होती. (संजीव कुमार यांनी साकारलेली भूमिका) असे असेल तर बंसंती (हेमा मालिनी)सोबत त्याची जोडी राहणार नाही हे सिप्पी यांनी सांगताच धर्मेंद्रने आपला इरादा बदलला.

"मी त्यांच्या खासगी जीवनात जाऊ शकणार नाही. धरम जी यांना ठाकुरच्या भूमिकेची भुरळ पडली होती. संपूर्ण कथा ठाकुरची असल्यामुळे ती भूमिका करावी असे त्यांना वाटत होते. पण नंतर मी त्याला सांगितले की त्यांना हेमा मालिनी मिळणार नाही. तो हसला आणि म्हणाला, ठीक आहे (वीरूच्या भूमिकेसाठी), असे सिप्पीने सांगितले.

अमिताभ बच्चन यांचे नावदेखील सलीम-जावेद यांनीच सूचवले होते. त्यांनी बच्चन यांचे "आनंद" आणि "बॉम्बे टू गोवा" या चित्रपटातील काम पाहिले होते.

"मला वाटत होते की आमच्याकडे धरम जी, हेमा जी, संजीव कुमार जी आणि जया भादुरी सारखे स्टार असताना इतर स्टार घेण्याची चिंता वाटत होती. आम्हाला चांगला कलाकार हवा होता. शत्रुघ्न सिन्हांबद्दल आम्हाला सजेशन मिळाले होते. अनेक स्टार्स आणि त्यांचे इगो हाताळणे मला कठिण वाटत होते...

हेही वाचा - प्रियांका चोप्राने 74 व्या स्वातंत्र्य दिनी 'शक्तीशाली आणि निर्भय' महिलांचे केले स्मरण

ही आणखी एक गोष्ट आहे जेव्हा जेव्हा आम्ही शूटिंगला सुरुवात केली तेव्हा बच्चन एक स्टार झाला. जंजीर आणि दीवार या चित्रपटामुळे त्यांची लोकप्रियता वाढली,'असेही ते पुढे म्हणाले.

जेलर (असराणी), कालिया (विजू खोटे), संभा (मॅक मोहन), सोर्मा भोपाली (जगदीप), रहीम चाचा (एके हंगल) आणि मौसी (लीला) या छोट्या व्यक्तीरेखांसाठी निवड केलेल्या कलाकारांबद्दल ४५ वर्षानंतरही अभिमान वाटत असल्याचे सिप्पी म्हणाले.

ते म्हणाले, “ही सर्व पात्रं चित्रपटासाठी महत्त्वाची आहेत, ती सर्व उत्कृष्ट पात्र होती, कलाकारांनी सहजतेने भूमिका बजावल्यामुळे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला,” ते पुढे म्हणाले.

प्रत्येक शॉट परिपूर्ण व्हावा अशी त्यांची इच्छा असल्यामुळे हा चित्रपट तयार होण्यासाठी वेळ मिळाला असे सिप्पी म्हणाले.

“जय, वीरू आणि ठाकूर यांच्यासह चित्रपटाच्या सुरूवातीला रेल्वे क्रम शूट करण्यासाठी सात आठवड्यांचा कालावधी लागला. आज संपूर्ण चित्रपट सात आठवड्यांत पूर्ण होत आहे.

आम्हाला सर्वोत्तम हवे होते. आणि प्रत्येक शॉट मिळविण्यासाठी, तो आयोजित करण्यासाठी आणि ट्रेन, घोडे, लोक, बंदुका आणि दारूगोळा घेऊन शूटिंग करणे, कलाकारांना आणि इतर सर्वांनातयार करणे , हे एक अतिशय कठीण शूटिंग होते, "असे ते म्हणाले.

दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक क्रम शूट करण्यासाठी सुमारे 20 दिवस किंवा त्याहून अधिक वेळ लागला, यह दोस्ती या गाण्यातील साइडकारसह मोटरसायकलवरील दृश्यांना चित्रीत करण्यासाठी 21 दिवस लागले, परंतु या प्रक्रियेवर त्यांचे पूर्ण प्रेम होते.

73 वर्षीय चित्रपट निर्मात्याने सांगितले की, त्यांना जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावाच्या सेव्हन समुराई (१९५४) आणि अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक जॉन स्टर्जेज 'द मॅग्निफिसिएंट सेव्हन (१९६०) दोन्ही चित्रपटांची कथा डाकूंकडून गाव वाचविण्याच्या भोवती फिरत होती. याव्यतिरिक्त हिंदीतील खोटे सिक्के ( १९६०),मेरा गाव मेरा देश (1971) आणि गंगा जमुना (1961) या सर्वा चित्रपटातून प्रेरणा मिळाल्याचे सिप्पी यांनी सांगितले.

१५ ऑगस्ट १९७५ रोजी जेव्हा सिप्पींचा शोले सिनेमागृहात आला तेव्हा काही वर्तमानपत्रांनी त्यावर अत्यंत घाणेरडी टीका केली. चित्रपटाला व्यावसायिक यश ही आणखी एक कहाणी आहे.

या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग चांगले होते परंतु चित्रपटाबद्दल येत असलेले निगेटिव्ह रिव्ह्यू व्यावसायिक यशाला नुकसान पोहोचू शकत होते, असे त्यांनी सांगितले.

पण प्रेक्षकांनी अशी प्रतिक्रिया कधीच दिली नाही, त्यांना हा चित्रपट आवडला. आम्ही पाहिले की प्रेक्षक वारंवार संवाद बोलत होते. मला (थिएटरमधील लोकांद्वारे) मला सांगण्यात आले की लोक कोल्ड्रिंक आणि पॉपकॉर्न खरेदी करण्यासाठी आपल्या जागा सोडत नाहीत." असे दिग्दर्शकांनी पुढे सांगितले.

सिप्पी शोलेला आपली “मोठी कामगिरी” मानतात. ते म्हणाले, "मी नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो परंतु या चित्रपटाचे सर्वात जास्त कौतुक झाले आहे. तुम्ही या सर्व गोष्टींची योजना कधीही आखू शकत नाही. चित्रपटाच्या यशामुळे मी स्तब्ध झालो आहे.," असं ते म्हणाले.

Last Updated : Aug 15, 2020, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.