निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कभी ख़ुशी कभी गम’ (K3G) ला २० वर्षे पूर्ण झाली, त्याचे खास सेलिब्रेशन अभिनेत्री आलिया भट आणि जान्हवी कपूर यांनी वेगळ्या पद्धतीने केले. आलिया भट्टने करीना कपूरचा ‘K3G’ चा सीन पुन्हा रिक्रिएट केला. सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चे शूटिंग सुरु असून तिथेच हा ‘फन-सीन’ चित्रित केला गेला ज्यात आलिया भट आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत असून करण जोहर दिग्दर्शन करतोय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
‘K3G’ मध्ये करीना कपूर उर्फ ‘पू’ (पूजाचा शॉर्ट फॉर्म) लंडन मधील कॉलेज मध्ये ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जात असते. कॉलेजातील वार्षिक समारंभासाठी ती तिच्याबरोबर येऊ पाहणाऱ्या मुलांचे इंटरव्ह्यू घेत असते ज्यात ह्रितिक रोशनदेखील पोहोचतो. हा एक गमतीदार सीन असून तो आलिया भटने तिची भावी नणंद करिष्मा कपूरची परफेक्ट नक्कल करीत केला. या सीनमध्ये इब्राहिम खान देखील (सैफ अली खानचा मुलगा आणि सारा अली खानचा भाऊ) आहे जो करण जोहरला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करतोय. आलियाने इब्राहिम अली खानला मायनस मार्क्स देऊन रिजेक्ट केले. रणवीर सिंग हृतिक रोशनच्या भूमिकेत सामील झाला ज्याने आलियाला म्हणजेच ‘पू’ ला रिजेक्ट केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दुसऱ्या ठिकाणी जान्हवी कपूरने (दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी), जिला करण जोहरने ‘धडक’ मध्ये (मराठी सैराटचा रिमेक) ब्रेक दिला, करीना कपूरच्या दुसऱ्या सीनचा व्हिडीओ बनविला. तिनेसुद्धा ‘K3G’ मधील ‘पू’ चा एक संवाद बेबोच्या स्टाइलमध्ये तंतोतंतपणे सादर केला आहे.
करीना कपूर खानने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर आपल्या होणाऱ्या वहिनीचा म्हणजेच आलियाचा व्हिडिओ पुन्हा शेअर केला आणि लिहिले, “‘पू’ पेक्षा अप्रतिम कोणीच नाही, अर्थातच माझी प्रिय आलिया त्याला अपवाद आहे.”
हेही वाचा - जॉन अब्राहमचे इंस्टाग्राम अकाउंट झाले ‘हॅक’, फॅन्स अस्वस्थ!