टेक्सास (यूएसए) : रेडवायर स्पेसचे मुख्य विकास अधिकारी आणि नासाचे माजी अधिकारी माईक गोल्ड यांनी 23 ऑगस्ट रोजी भारताच्या चंंद्रयान 3 मोहिमेचं कौतुक केलं. मिशन यशस्वी होवो अथवा न होवो हे एकंदरीतच यश असल्याचं सांगितलं. माईक गोल्ड हे अंतराळ विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव, त्यांना आर्टेमिस रेकॉर्डचे वास्तुविशारद देखील मानले जाते.
अमूल्य डेटा गोळा करेल : माईक गोल्ड म्हणाले की, आम्ही एका नव्या युगात प्रवेश करत आहोत. चंद्राच्या शोधाचा आर्टेमिस युग जिथे आपण फक्त एकदाच नाही, दोनदा नाही तर चंद्रावर कायमचे अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी जातोय. हे मिशन चंद्राविषयीची आमची समज, संसाधने वापरण्याची आमची क्षमता आणि शेवटी आम्ही चंद्रावर कुठे वसाहती स्थापित करणार आहोत, यासाठी अमूल्य डेटा गोळा करेल. त्यामुळे हा त्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे. मिशन यशस्वी झाले किंवा नाही याला आता तितकेसे महत्व राहणार नाही. तर माझ्या मते, अशा प्रकारचे मिशन राबवणे हेच एक संपूर्ण यश आहे.
हवामानातील बदलांशी संबंधित : चंद्रयान मिशन हे चंद्रावर जागतिक संशोधनात्मक सहकार्याला चालना देईल. सध्या NASA आणि ISRO सोबतचे आमचे बहुतेक सहकार्य पृथ्वीवर केंद्रित आहे, जे NISAR सारख्या प्रकल्पांसारखे उत्तम आहे, जिथे भारतासोबत आम्ही पृथ्वीचा अभ्यास करू शकतील अशा रडार प्रणाली तयार करणार आहोत. हवामानातील बदल आणि हवामानातील बदलांशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी खूप महत्त्वाचा डेटा या मोहिमांच्या अभ्यासामधून तयार होणार आहे. जो भारत, अमेरिका आणि संपूर्ण जगासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चंद्रयान पृथ्वीच्या कक्षेबाहेर चंद्राच्या पृष्ठभागावर जाईल जिथे रोबोट आणि मानवी अंतराळ संशोधनाचे पुढील युग एका अर्थाने सुरू होणार आहे. असेही माईक गोल्ड पुढे म्हणाले.
हेही वाचा :
- ISRO shares pictures of Moon : इस्रोने शेअर केले चंद्राच्या अंधाऱ्या भागाचे फोटो; चंद्रयान 3 सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रसारण ...
- Chandrayaan 3 Live streaming : इस्रो करणार चंद्रयान 3 च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण; अनेक चॅनेलवर दिसणार भारताचे मिशन मून
- Chandrayaan 3 interview : भारताची तिसरी चंद्र मोहीम; चंद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल