सॅन फ्रांन्सिस्को : चॅट जीपीटीने जागतिक पातळीवरील टेक जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. आपण सांगितलेली सगळी माहिती चॅट जीपीटीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे टेक जगात चॅट जीपीटी कायम चर्चेत असते. आता तर मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या असलेल्या चॅट जीपीटीचे अॅप विकसित करण्यासाठी थर्ड पार्टीला परवानगी दिली आहे. त्यानुसार चॅट जीपीटीचे आणि व्हिस्पर यांना विकसित करण्यासाठी अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस एकत्र करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
अत्याधुनिक भाषा उपलब्ध : मायक्रोसॉफ्टने थर्ड पार्टी विकासकांना चॅट जीपीटी विकसित करण्यास परवानगी दिल्याने चॅट जीपीटीमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चॅट जीपीटी आपल्या यूजरसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळेच मायक्रोसॉफ्टने त्यांच्या चॅट जीपीटी आणि व्हिस्पर यांना अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) एकत्रित करण्याची परवानगी दिली आहे. एपीआयमध्ये चॅटजीपीटी आणि व्हिस्पर मॉडेल्स सादर केल्यामुळे आता अत्याधुनिक भाषा आणि स्पीचटू टेक्स्ट वैशिष्ट्ये चॅट जीपीटीमध्ये उपलब्ध असल्याची माहिती कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.
ओपन एआयने केल्या सुधारणा : चॅट जीपीटी आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काही सुधारणा करत असते. त्यात यावेळीही काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. चॅट जीपीटी वापरकर्तेही सतत मॉडेल सुधारणा आणि मॉडेल्सवर सखोल नियंत्रणासाठी सुधारण्याची अपेक्षा करतात. त्यानुसार सुधारणा करण्यात आल्याचे ओपन एआयने स्पष्ट केले आहे. त्यासह ओपनएआयने काही कंपन्यांचाही उल्लेख केला आहे. या स्नॅपच्या माय एआय वैशिष्ट्यासह नवीन एपीआय वापरत आहेत. याबाबतची घोषणा या आठवड्याच्या सुरुवातीला करण्यात आली होती.
एआय देणार उत्कृष्ठ सुविधा : मायक्रोसॉफ्टने चॅट जीपीटच्या विकासकांना एपीआयसाठी ओपन एआय २ डॉलर १ हजार टोकन ऑपर करत आहे. हे जुन्या जीपीटी ३.५ मॉडेल्सपेक्षा १० टक्के स्वस्त असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. त्यामुळे विकासकांना त्यांच्या विशिष्ट मॉडेल निवडण्याची संधीही या माध्यमातून मिळेल असेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले आहे. त्यासह कंपनीने आपल्या विकासकांना सध्या वापरत असलेल्या ३.५ या टर्बो मॉडेल्सवर विविध सुविधा दिल्या असून ते स्थिर राहमार असल्याचेही कंपनीने आपल्या दाव्यात स्पष्ट केल्याचे वृत्त आयएएनस या वृत्तसंस्थेने दिले आहे.
हेही वाचा - Subvariants XBB 1.5 : अमेरिकेत करोडो मुलांना फ्लूची लागण, आतापर्यंत १८ हजार चिमुकल्यांचा मृत्यू