हैदराबाद - सध्या कोरोना विषाणूचा फटका सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असले तरी पँगोलीन अर्थातच ‘खवले मांजर’ या प्राण्यावर मात्र अशा विषाणूंचा फार कमी प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. लुप्त होत चाललेल्या या सस्तन प्राण्यांमध्ये असणार्या अनुवंशिक विविधतेमुळे असे घडत असावे, असा संशोधकांचा दावा आहे. या पँगोलीनने वटवाघुळापासून मनुष्यांपर्यंत कोरोना विषाणूचा वाहक म्हणून काम केले असावे, असा अंदाजही शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. शास्त्रज्ञांसमोर उभा असलेला मुख्य प्रश्न म्हणजे पँगोलीनच्या जीनोममध्ये असलेले वेगळेपण, कोरोना विषाणू मनुष्यावर इतक्या तीव्रतेने परिणाम करत असला तरी, इतर प्राण्यांना या विषाणूची कसलीही इजा होत नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांना असे वाटते की, जर पँगोलीनच्या शरीरातील ‘जनुके प्रणाली’ शोधली गेली. तर मनुष्यांमध्ये वेगात पसरणाऱ्या या कोरोना विषाणूला रोखता येऊ शकेल. असं झालं तर मनुष्याचं कोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्वात मोठं यश असेल, अशी आशाही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.
“मानवाच्या रोगप्रतिकार शक्तीच्या तुलनेत पँगोलीनची रोगप्रतिकारक शक्ती कोरोना विषाणूशी लढण्यासाठी अधिक सक्षम असल्याचे दिसते. जेव्हा एखादा विशिष्ट विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो तेव्हा मानवाच्या शरीरातील काही जीन्स अशा विषाणूचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच शरीराची प्रतिकारशक्तीही वाढवतात. पँगोलीनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूमध्ये दोन जीन्स गायब आहेत. म्हणूनच, या प्राण्यामध्ये विषाणूशी लढण्यासाठी कोणतीही प्रतिकारशक्ती नाही नाही. या प्रजातीमध्ये रोगप्रतिकार शक्ती असलीच तर त्याचे प्रमाण खुप कमी आहे. तसेच पँगोलीनचा विषाणूला प्रतिसाद देण्याचा कालावधीही बदलता आहे. त्यामुळेच पँगोलीन्सवर कोरोना विषाणूचा कसलाही परिणाम होत नाही” असे मत ऑस्ट्रियन संशोधकाने मांडले आहे.
त्यांनी पँगोलीन, मानव आणि इतर सस्तन प्राण्यांच्या जिनोमची एकमेकांशी तुलना केली आहे. त्या अभ्यासात असे आढळले आहे की, इतर सस्तन प्राण्यामध्ये असलेली रोगप्रतिकारक शक्ती गेल्या हजारो वर्षांपासून पँगोलीनसारख्या प्रजातीमध्ये आढळत नाही. ज्याप्रमाणे पँगोलीन प्रजातीच्या रोगप्रतिकार प्रणालीमुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण बसले आहे. अगदी त्याचप्रमाणे शास्त्रज्ञ सध्या कोवीड-१९च्या अनुवंशिक गुणधर्मावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी कोरोना विषाणूचे परिणाम नियंत्रित करू शकणार्या संबंधित औषधाचीही मदत घेतली जात आहे.
हेही वाचा - कोरोनावरील लसी कशा काम करतात..?