ETV Bharat / opinion

'डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅच कायद्याचे उल्लंघन केले नाही' - hatch act news

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्वीकृती भाषण देऊन हॅच कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमेरिका कायद्याचे जाणकार भारतीय वकिल सुरत सिंह म्हणाले, की डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅच कायद्याचे उल्लंघन केले नसून त्यांनी फक्त अमेरिका सरकारच्या नियमांचे उल्लघंन केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Aug 30, 2020, 4:22 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टीने आपले अधिकृत उमेदवार म्हणून पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांचीच अधिकृत घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये स्वीकृती भाषण देऊन हॅच कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमेरिका कायद्याचे जाणकार भारतीय वकिल सुरत सिंह म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅच कायद्याचे उल्लंघन केले नसून त्यांनी फक्त अमेरिका सरकारच्या नियमांचे उल्लघंन केले आहे.

1939 हॅच कायदा हा (राष्ट्रध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना वगळून ) शासकीय कर्मचाऱ्यांच्या राजकारणातील सहभागावर निर्बंध घालणारा आहे. हा कायदा 2 ऑगस्ट 1939 ला तयार करण्यात आला आहे. या कायद्याचे नाव न्यू मँक्सिकोचे सिनेटर कार्ल हॅच यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. बराक ओबामा राष्ट्रध्यक्ष असताना या कायद्यामध्ये 2012 ला सुधारणा करण्यात आली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणानंतर सरकारी नितीविभागाच्या कार्यालयाचे प्रमुख वाल्टर शब यांनी टि्वट करून ट्रम्प यांच्यावर टीका केली. हॅच कायदा ही सरकारची शक्ती आणि उमेदावारांच्यामधातील एक भिंत होती. ही भिंत आज एका उमेदवाराने पाडली. दरम्यान, यावेळी माईक पोम्पिओदेखील अधिवेशनात पाहायला मिळाले. ते परराष्ट्र विभागाच्या कार्यलयीन दौऱ्यावर होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅच कायद्याचे उल्लंघन केले नसले. तरी त्यांनी अमेरिका सरकारच्या इतर नियमांचे उल्लंघन केले आहे. ट्रम्प यांनी देशाला टि्वटच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या सर्व ऐतिहासिक नियमांचे उल्लंघन झाले. त्यांनी कोरोना विषाणूसंदर्भात वैज्ञानीकांच्याऐवजी स्वत:ताचे मत मांडले. ओबामा यांनी जी नैतिकता आपल्या कार्यकाळात नेतृत्वाला दिली होती. ती ट्रम्प यांच्या काळात वेगाने घसरली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.