ETV Bharat / opinion

विश्वासार्ह लसीच्या शोधात...

साठच्या दशकात, या लसीला जी मूलतः टॉन्सिलवर उपचार करण्याच्या इराद्याने तयार केली जाणार होती, चार वर्षांच्या व्यापक परीक्षणानंतर अंतिम मंजुरी प्राप्त झाली. इतर लसीच्या तुलनेत ही लस सर्वाधिक कमी कालावधीत साध्य झाली. एचआयव्ही नियंत्रित करण्याच्या उद्देष्याने तयार करण्यात येत असलेल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या तीन दशकांहून अधिक काळ चालल्या होत्या....

In search of a reliable vaccine
विश्वासार्ह लसीच्या शोधात...
author img

By

Published : Sep 16, 2020, 1:52 PM IST

हैदराबाद : जवळपास अर्धा कोटी देशांतर्गत आणि जवळपास तीन कोटी जगभरात कोविड केसेसचा अनियंत्रित प्रसार महामारीच्या तीव्र प्रसाराचे संकेत देत आहे. योग्य लसीसाठी विविध देशांमध्ये सुरू असलेल्या १४०हून अधिक प्रयोगांच्या यशाची प्रतीक्षा मानवजात उत्सुकतेने करीत आहे. ऑक्सफर्डमधील लस शोधण्याच्या प्रयोगाने दोन टप्पे यशस्वीपणे पार पाडले असले तरीही आता प्रयोगाच्या अत्यंत महत्वाच्या तिसऱ्या टप्प्यात असताना, अपेक्षित अडथळ्याला सामोरे गेला आहे. इंग्लंडची सर्वात विशाल औषधे बनवणारी कंपनी अस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने तिसऱ्या टप्प्यातील प्रयोग यासाठी स्थगित केले आहेत, कारण लस टोचलेल्या स्वयंसेवकामध्ये स्नायुविज्ञानविषयक गुंतागुंत निर्माण झाली. स्वायत्त सुरक्षा आणि फेरआढावा समितीने तातडीचे निरिक्षण केल्यानंतर त्यांनी आता प्रयोग पुन्हा सुरू केला आहे. लसीचे यश हे संशोधनाच्या यशावर अवलंबून आहे, जे संशोधन व्यापक स्तरावर विविध टप्प्यांमध्ये करण्यात आले असून संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर लस यशस्वी झाली पाहिजे.

गेली अनेक वर्षे, अनेक वैज्ञानिक इशारा देत आहेत की, अनेक गुंतागुंती निर्माण होत असल्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी परिणामकारक लसीची रचना तयार करणे सोपे नाही. व्हाईट हाऊसचे अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर आपल्या देशाच्या लस उत्पादन करणाऱ्या प्रयोगशाळांची हॅकिंग करत असल्याचा केलेला आरोप, संपूर्ण मंजुरी येईपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण केले जाऊ शकते, ही बीजिंगने घाईघाईत केलेली घोषणा आणि तिसऱ्या टप्प्याचा उल्लेखही न करता रशियाने चालवलेली सामूहिक लसीकरणाची तयारी... हे सर्व जीव वाचवणारे औषध विकसित करण्याबाबत अनेक शंका निर्माण करत आहेत. वैज्ञानिक असे म्हणतात की, परीक्षेचा तिसरा टप्पा यशस्वीपणे पार पाडल्यावर लस सार्वजनिक उपयोगासाठी आणण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १२ ते १८ महिने लागू शकतील. अस्ट्रोजेनने, या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षीच्या सुरुवातीला, लस उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जे अलिकडेच आश्वासन दिले आहे, ते धोकादायक घाईकडे अंगुलीनिर्देश करत आहे.

साठच्या दशकात, या लसीला जी मूलतः टॉन्सिलवर उपचार करण्याच्या इराद्याने तयार केली जाणार होती, चार वर्षांच्या व्यापक परीक्षणानंतर अंतिम मंजुरी प्राप्त झाली. इतर लसीच्या तुलनेत ही लस सर्वाधिक कमी कालावधीत साध्य झाली. एचआयव्ही नियंत्रित करण्याच्या उद्देष्याने तयार करण्यात येत असलेल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या तीन दशकांहून अधिक काळ चालल्या होत्या. ही तथ्ये माहित असूनही, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने भारतीय लसीसाठी १५ ऑगस्टची अवास्तव मुदत निश्चित केली आणि त्याबद्दल व्यापक टीका ओढवून घेतली. त्यानंतर त्यांनी आपले विधान बदलले आणि विविध टप्प्यांतील प्रयोग जलदीने पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही ही घाई केली, असे सांगितले.

लस तयार करण्याच्या प्रयोगात, प्रत्येक टप्प्यावर आत्यंतिक काळजी घ्यायला हवी. दुसऱ्या जागतिक महायुद्धात, अमेरिकेने तयार केलेल्या पिवळ्या तापावरील लस, जी अपघाताने हेपॅटायटिस बी विषाणूने दूषित झाली होती, अनेक सैनिक गंभीर आजारी झाले आणि कित्येक तर मरण पावले. पोलिओ लसीच्या चाचण्यांच्या सुरुवातीच्या दिवसात, निष्काळजीपणाने हजारो लोक विषाणूने संसर्गग्रस्त राहिले. बीआयटीएस पिलानीचे अनुमान असे आहे की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोना विषाणूमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा ७० लाख पार करून जाईल. हे आता प्रमुख संकट बनत आहे. अभ्यासांनी हे दाखवून दिले आहे की, कोरोनाचा संसर्ग झालेल्या लाखो लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये प्रतिजन विकसित होतात. अनेक देशांना आता कुठलाही भेद न करता विषाणूच्या फेरहल्ल्याची भीती सतावत आहे. सध्याच्या घडीला, लसीच्या परिणामकारकतेबद्दल संपूर्ण विश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत लस तयार करणाऱ्या कंपन्या आणि सरकारांनी संयम पाळणे हेच महत्त्वाचे आहे. कोरोनावरील औषधाच्या नावाखाली केलेला प्रयोग अपयशी ठरला तर या क्षणी, मानवतेकडे नुकसान आणि अडचणीमध्ये टिकून रहाण्याची सहनशक्ती नाही, हेच कठोर वास्तव आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.