हैदराबाद - रक्ताच्या सीरममध्ये अँटी-एव्हीयन इन्फ्लूएंझा विषाणूविरोधी अँटीबॉडी/प्रतिपिंडांचा २० मिनिटात शोध घेण्यात यश मिळाल्यानंतर आता पोर्टेबल अॅनालायजरचा वापर करून ऑन-साइट बायो टेस्ट/जैव चाचणी करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. सार्स कोव्ह २ विरोधी अँटिबॉडीजचा शोध घेण्यासाठी केमिकलमधील विशिष्ट घटक विकसित झाला की या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
होक्काइडो युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ केमिकल सायन्स अँड इंजिनिअरिंगमधील डॉक्टरेट विद्यार्थी कीन निशियामा आणि विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मनाबू टोकेशी यांच्या नैतृत्वाखालील गटाने या तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. अँटीबॉडीजचा शोध घेण्यासाठी नवीन पद्धत विकसित करताना वेगवान, सहज आणि निवडक अँटीबॉडी शोधणारे अॅनालायजर विकसित करण्यात आले. एव्हीयन इन्फ्लूएन्झा हा कोंबड्यांना होणारा रोग आहे जो इन्फ्लूएंझा ए विषाणूच्या संसर्गामुळे होतो.
हे तंत्रज्ञान 'एफपीआयए'वर आधारित आहे. मात्र, अॅनालायजरचा आकार लहान ठेवण्यासाठी आणि ते पोर्टेबल बनविण्यासाठी भिन्न मोजमापन यंत्रणा वापरण्यात आली. अॅनालायजरचे वजन केवळ ५.५ किलोग्रॅम आहे. एकाचवेळी अनेक नमुन्यांची तपासणी करणे आणि नमुन्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रतिमेचे सेन्सर असलेले लिक्विड क्रिस्टल रेणू आणि मायक्रोफ्लूइडिक डिव्हाइसच्या एकत्रित वापराचा या संशोधक गटाने वापर केला.
कोविड-१९ विषाणूमध्ये आढळणाऱ्या स्पाईक प्रोटीन्सचे पुनरुत्पादन करून आणि त्याचा अॅनालायजरमध्ये केमिकल म्हणून वापर करून अँटीबॉडी शोधण्यात येईल असे टोकेशी म्हणाले. मायक्रोफ्लूइडिक डिव्हाइसमध्ये मोजमाप करण्यासाठी असंख्य सूक्ष्म वाहिन्या (मायक्रो चॅनल) आहेत, तर लिक्विड क्रिस्टल रेणू हे फ्लूरोसंट लाईटचे ध्रुवीकरण रोखण्यास सक्षम आहे.
या गटाने अँटी-एच 5 एव्हीयन इन्फ्लूएन्झा विषाणू विरोधी अँटीबॉडी शोधण्यासाठी देखील केमिकलमधील विशिष्ट घटक विकसित केला आहे. या केमिकल घटकाच्या विकासासाठी हेमाग्ग्लूटीनिन (एचए) प्रोटीनच्या भागांचे पुनरुत्पादन केले होते. यामध्ये एचए प्रोटीनच्या तुकड्यांना एच 5 एव्हीयन इन्फ्लूएन्झा विषाणूच्या पृष्ठभागावर, जनुकांच्या पुनर्संयोजनाद्वारे आणि तुकड्यांना फ्लूरोसंट रेणूंचे लेबलिंग केले जाते. पक्ष्यांपासून गोळा केलेले सीरम केमिकल घटकामध्ये मिसळून त्याचे मोजमाप करण्यासाठी १५ मिनिटे ठेवले जाते. त्यानंतर हा द्रव मायक्रोफ्लूइडिक डिव्हाइसमध्ये ठेवून पोर्टेबल फ्लूरोसेंस ध्रुवीकरण अॅनालायजरमध्ये मोजले गेले.
रेणूंची प्रक्रिया होऊन या घटकापासून अँटिबॉडीशी संबंधित नसलेले एक वेगळेच ध्रुवीकरण होते. केवळ २ मायक्रोलिटरद्वारे अँटी-एच 5 एव्हीयन इन्फ्लूएन्झा विषाणू विरोधी अँटिबॉडीचा २० मिनिटांत शोध घेतला जाऊ शकतो. "केमिकल मधील विशिष्ट घटक विकसित केल्यास जैव चाचण्या घेण्यासाठी आमच्या अॅनालायजरचा वापर केला जाऊ शकतो", असे टोकेशी म्हणाले. औषधांमधील घटकांचा आणि मायकोटोक्सिनचा या गटाने या पूर्वीच शोध लावला आहे.