ETV Bharat / opinion

उपचार केंद्रातील अभ्यासातून कोविड-१९चा मुलांवर होणारा परिणाम स्पष्ट..

जर्नल ऑफ पेडियाट्रिक्समध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात कोरोना विषाणूचा मुलांवर होणाऱ्या परिणामाबद्दलची माहिती दिली आहे. अहवालात १ महिना ते २१ वर्षे वयोगटातील ४६ मुलांची तुलना केली गेली आहे. यापैकी काहींना जनरल युनिटमध्ये तर काहींना सीएचएएम मधील बालरोगविषयक क्रिटिकल केअर युनिट (पीसीसीयू) मध्ये ठेवण्यात आले होते.

New study from pandemic epicenter describes severe COVID-19 response in children
उपचार केंद्रातील अभ्यासातून कोविड-१९चा मुलांवर होणारा परिणाम स्पष्ट..
author img

By

Published : May 25, 2020, 8:40 PM IST

हैदराबाद - मॉन्टीफोर येथील चिल्ड्रेन्स हॉस्पिटल (सीएचएएम) आणि अल्बर्ट आइन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिनमधील बालरोग तज्ञ, भूलतज्ञ, संसर्गजन्य रोग तज्ञ यांनी केलेल्या अभ्यासात कोरोना विषाणूचा मुलांवर होणाऱ्या परिणामाबद्दलची माहिती दिली आहे.

जर्नल ऑफ पेडियाट्रिक्समध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात १ महिना ते २१ वर्षे वयोगटातील ४६ मुलांची तुलना केली आहे, यापैकी काहींना जनरल युनिटमध्ये तर काहींना सीएचएएम मधील बालरोगविषयक क्रिटिकल केअर युनिट (पीसीसीयू) मध्ये ठेवण्यात आले होते. एकाच केंद्रातून एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला हा अमेरिकेचा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अभ्यास आहे. रूग्णालयात दाखल झालेल्या मुलांमध्ये कोविड १९ महामारीचा नेमका काय परिणाम झाला याचे तपशीलवार वर्णन या अहवालात करण्यात आले आहे.

जनरल युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या मुलांच्या तुलनेत अतिदक्षता कक्षात घेत असलेल्या मुलांमध्ये शरीर दाहाचा त्रास आणि श्वास घेण्याची आवश्यकता जास्त असते असे संशोधकांना आढळून आले. पीसीसीयूमध्ये भरती मुलांपैकी जवळजवळ ८० टक्के मुलांमध्ये श्वसनाचा गंभीर आजार /अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमचा (एआरडीएस) त्रास दिसून आला जो सामान्यत: गंभीर आजारी असलेल्या कोविड १९च्या प्रौढ रुग्णांमध्ये आढळून येतो. तर एआरडीएसचा त्रास असलेल्या जवळपास ५० टक्के मुलांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

“आपल्याला माहिती आहे की प्रौढांमधे गंभीर आजारांना आमंत्रण देणारा लठ्ठपणा कारणीभूत आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या मुलांच्या तुलनेत जनरल युनिटमधील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जास्त होते.” असे एमडी, एमएस्सी. सीएचएएम येथील बालरोग भूलतज्ञ , आइन्स्टाईन येथील सहाय्यक प्राध्यापक भूलतज्ञ आणि लेखक जेरी. वाय. चाओ यांनी म्हटले आहे.

संशोधकांना असेही आढळले की निम्म्याहून अधिक मुलांचा कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींशी कोणताही संपर्क नव्हता. यावरून हे लक्षात आले की, कोरोनाची लक्षणे आढळून न आलेल्या लोकांद्वारे देखील कोरोना पसरत आहे. त्यामुळे लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या समुदायांमध्ये कोविड-१९ पसरण्याचे प्रमाण जास्त असू शकते.

“सुदैवाने कोविड-१९ची लागण झालेली बहुतांश मुले पूर्णपणे बरी झाली तर काहींमध्ये कुठलीच लक्षणे आढळून आली नाहीत. परंतु कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मुलांमध्ये आवश्यक प्रतिकारशक्ती अगोदरपासूनच आहे किंवा मुले कोरोना विषाणूला 'इम्यून' आहेत हा गैरसमज या संशोधनामुळे दूर झाला असून मुलांची देखील विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे लक्षात आले," असे एमएडी, एफएएपी. आणि सीएचएएम येथील हृदयरोग अतिदक्षता विभागातील चिकित्सक आणि आईन्स्टाईन येथील पेडियाट्रिक्सचे सहाय्यक प्राध्यापक, ज्येष्ठ लेखक शिवानंद एस. मेदार यांनी म्हटले आहे.

या प्राथमिक निष्कर्षांमधून बालकांवर कोविड-१९चा होणारा परिणाम समजण्यास मदत झाली मात्र, विषाणूमुळे मुलांवर नेमका कसा आणि कितपत परिणाम होतो हे समजण्यासाठी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे. "

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.