ETV Bharat / opinion

कोरोनाशी लढा देण्यासाठी जागतिक नेत्यांनी प्रेसिजन मेडिसिनचा मार्ग केला खुला - वर्ल्ड इकोनॉमिक फोरम

प्रेसिजन मेडिसिन हे योग्य वेळी योग्य रुग्णाला योग्य उपचार मिळवून देण्याची खात्री देऊ शकते. परंतु इतर अ‌ॅडॉप्ट केलेल्या औषधांचा परिणाम असमान असू शकतो. त्यामुळे एकसंध उपचार पध्दतीला आधार देण्यासाठी आणि त्याचा फायदा अधिक सहजतेने मोजता यावा यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ग्लोबल प्रेसिजन मेडिसिन काउंन्सिलने धोरण कर्त्यांसाठी प्रेसिजन मेडिसिनच्या तत्त्वांचा पहिला सेट तयार केला आहे.

Global leaders unlock ways for precision medicine to fight COVID-19: WEF
कोरोनाशी लढा देण्यासाठी जागतिक नेत्यांनी प्रेसिजन मेडिसिनचा मार्ग केला खुला - वर्ल्ड इकोनॉमिक फोरम
author img

By

Published : Jun 3, 2020, 10:32 PM IST

नवी दिल्ली - दैनंदिन जीवनात पुन्हा स्थैर्य आणण्यासाठी आणि जागतिक स्तरावर कोविड-१९ वर मात करण्यासाठी प्रेसिजन मेडिसिनचा (लक्ष्यित लस आणि अँटीव्हायरल औषधे) वापर करणे गरजेचे आहे. सध्या कोणतेही परिणामकारक औषध किंवा लस विकसित आणि वितरित करण्यासाठी बरीच अडथळे अस्तित्त्वात आहेत.

कोविड-१९ला रोखण्यासाठी प्रभावी लस तयार करण्याची शर्यत जसजशी पुढे जाईल तसे त्यांना प्रेसिजन मेडिसिनची तत्त्वे मदत करू शकतील. ज्याप्रमाणे प्रेसिजन मेडिसिने कर्करोगासारख्या आजारावर उपचार आणि इतर प्रतिबंधात्मक साधने निर्माण केली. त्यामुळे याची कर्करोगाच्या यशस्वी उपचार पद्धतीचे संशोधन करण्यास मदत झाली.

प्रेसिजन मेडिसिन हे योग्य वेळी योग्य रुग्णाला योग्य उपचार मिळवून देण्याची खात्री देऊ शकते. परंतु इतर अ‌ॅडॉप्ट केलेल्या औषधांचा परिणाम असमान असू शकतो. त्यामुळे एकसंध उपचार पध्दतीला आधार देण्यासाठी आणि त्याचा फायदा अधिक सहजतेने मोजता यावा यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ग्लोबल प्रेसिजन मेडिसिन काउंन्सिलने धोरण कर्त्यांसाठी प्रेसिजन मेडिसिनच्या तत्त्वांचा पहिला सेट तयार केला आहे.

ग्लोबल प्रेसिजन मेडिसिन व्हिजन स्टेटमेंटमध्ये त्यांनी वैयक्तिक उपचारांसाठी योग्य आणि समान संधीची आधारभुत रुपरेषा स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर प्रेसिजन मेडिसिनचा वापर वाढवण्यासाठी सध्या जगभरात तयार धोरणे आणि प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करण्याची आशा व्यक्त केली आहे.

या क्षेत्रातील विविध भागात राहणाऱ्या रूग्णांपासून ते धोरण कर्त्ये, खर्च करणारे आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी प्रेसिजन मेडिसिन निर्माण करण्याच्या अनुषंगाने विविध धोरणांना एकत्रित करणारे हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते.

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या प्रेसिजन मेडिसिनच्या प्रमुख जेन्या डॅना म्हणाल्या की, “प्रिसिजन मेडिसिनमुळे जागतिक आरोग्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. परंतु उपचाराबाबत मिळणाऱ्या संधी असमान आहेत. नवीन तंत्रज्ञानाविषयी बरेचसे नैतिक प्रश्न उपलब्ध आहेत. मात्र महत्त्वपूर्ण माहिती ही सार्वभौम देशांच्या सीमेपलिकडे आहे.”

प्रेसिजन मेडिसिन निर्मितीतील महत्त्वपूर्ण प्रगती कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि मुख्य घटकांबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या मॉडेलमध्ये असणाऱ्या धोरणात्मक त्रुटींचा उहापोह या अहवालात केला आहे. त्या पुढीलप्रमाणे -

  • रुग्णांची थेट अनुवांशिक चाचणी घेण्यासाठी विश्वास आणि प्रतिबद्धता निर्माण करणे.
  • या नाजूक परिस्थितीत अचूक उपचारासाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध करुन द्याव्यात.
  • जीनोमिक डेटाची गोपनीयता आणि मालकी याविषयी संशोधनासाठी नियामक यंत्रणेची उभारणी करणे.

आरोग्य सेवा प्रदान करणारे, टेक्नोलॉजी एक्सपर्ट, शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या शिफारसी आणि केस स्टडीच्या माध्यमातून या त्रुटी कशा भरुन काढायच्या याबद्दल या अहवालात ठळकपणे नमूद केले आहे. धोरणकर्त्यांकडे आता एक फ्रेमवर्क आहे की, ज्याच्या माध्यमातून ते आपापल्या देशात अचूक औषध कार्यक्रम राबवू शकतात. तसेच ते आरोग्य सांभाळण्यासोबतच रोगापासून बचाव करण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक मार्गाचा अवलंब करुन न्याय्य आणि प्रभावी संधी उपलब्ध करुन देवू शकतात.

“आम्हाला विश्वास आहे की, प्रेसिजन मेडीसिन रुग्णांच्या उपचारामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करेल,” असे क्वायजेनचे उपाध्यक्ष आणि ऑन्कोलॉजी अँन्ड प्रेसिजन डायग्नोस्टिक्सचे प्रमुख जोनाथन अर्नोल्ड म्हणाले.

“आम्ही यापूर्वीच कर्करोगाच्या उपचारात आणि संशोधनात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. ज्यामध्ये प्रेसिजन मेडिसिनच्या लक्षणीय प्रगतीचा देखील समावेश आहे.” असे डाना-फार्बर कर्करोग संस्थेच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरी एच. ग्लिमचर यांनी सांगितले.

प्रेसिजन मेडिसिन व्हिजन स्टेटमेंट आणि त्यातील ठळक बाबी :

  • वैयक्तिक आरोग्य विदाचे संग्रह आणि वापराबद्दल पारदर्शकता सुनिश्चित करावी.
  • वैयक्तिक आरोग्याचा विदाचा वापर भेदभाव करण्याच्या हेतूंसाठी वापरण्यास प्रतिबंध करावे.
  • उपचाराच्या संधी जलद उपलब्ध होण्यासाठी सध्याच्या औषध मंजूर प्रक्रियेचे आधुनिकीकरण करावे.
  • बौद्धिक संपत्ती आणि बायोमार्कर्सच्या पेटेंटसाठीच्या व्यवस्थेत सुधारणा करावी.
  • विदा सामायिकीकरण, शोधनीयता, सहज उपलब्धता, अंतर्गत माहिती आदान-प्रदान करण्याची क्षमता आणि पुन्हा वापर करता येण्यायोग्य व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी.
  • पारंपारिकपणे संशोधनाचा भाग नसलेल्या लोकसंख्येला गुंतवून ठेवण्यासाठी सांस्कृतिकदृष्ट्या जागरूक आणि परस्पर फायदेशीर ठरणारा मार्ग विकसित करावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.