नागपूर- राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे. इथे कुणीही समाधानी नाही. प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या झाल्यात, त्यामुळे जीवनातील आनंद हरवलाय, असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. राजकारण असो की कार्पोरेट जग असो इथे प्रत्येक जण असंतुष्ट असल्याचे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय, ते काल 50 गोल्डन रुल ऑफ लाईफ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात नागपूर येथे बोलत होते.
राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर : कोणत्याही विषयावर बोलताना आढेवेढे न घेता थेट भाष्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक टिपण्णी केलीय. ते म्हणाले की, जो नगरसेवक झालाय, त्याला दुःख आहे की आमदार झालो नाही, जो आमदार झालाय, त्याला मंत्री होता आले नसल्याचं दुःख आहे, तर जो मंत्री झालाय त्याला मनासारखे खाते मिळाले नसल्याचे दुःख आहे आणि मुख्यमंत्री होता न आल्याचे शल्य त्यांच्या मनात आहे. जो मुख्यमंत्री झाला आहे, त्याला पक्षश्रेष्ठी केव्हा पदावरून बाजूला करतील याची भीती सतावतेय. राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे. इथे कुणीही समाधानी नाही. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग असल्याचे गडकरी म्हणालेत.
जीवन हा तडजोडी, मजबुरी, अडथळे आणि विरोधाभासांचा खेळ : ते पुढे लिहितात की, जीवन हा तडजोडी, मजबुरी, अडथळे आणि विरोधाभासांचा खेळ आहे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा कॉर्पोरेट जीवन असले तरी ते आव्हाने आणि समस्यांनी भरलेले असते. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला 'आर्ट ऑफ लिव्हिंग' समजून घ्यावे लागेल, असंही नितीन गडकरींनी अधोरेखित केलंय.
सुखी जीवनासाठी मानवी मूल्यांची गरज : तसेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील एक वाक्य आठवते, ज्यात म्हटले आहे की, 'माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो संपत नाही, जेव्हा तो हार मानतो तेव्हा तो संपतो,' असंही नितीन गडकरी म्हणालेत. 'सुखी जीवनासाठी चांगल्या मानवी संस्कारांची गरज आहे. जीवन जगण्याचे आणि यशस्वी होण्याचे सोनेरी नियम सांगतानाच त्यांनी 'व्यक्ती, पक्ष अन् तत्त्वज्ञानाचे महत्त्वही गडकरींनी अधोरेखित केलंय.
हेही वाचा :