ETV Bharat / technology

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस का साजरा केला जातो?, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

2 डिसेंबर 1984 मध्ये भोपाळमध्ये गॅस दुर्घटना झाली होती. या घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या स्मरणासाठी 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' साजरा केला जातो.

National Pollution Control Day
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : 2 hours ago

Updated : 47 minutes ago

हैदराबाद National Pollution Control Day : दरवर्षी 2 डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' साजरा केला जातो. हा दिवस 1984 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीस समर्पित आहे. भोपाळ गॅस दुर्घटना ही जगातील सर्वात भयानक औद्योगिक अपघातांपैकी एक होती. या दुर्घटनेत हजारो नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले होते. तसंच यामुळं लाखो लोक प्रभावित झाले होते. या दिवसाचा उद्देश केवळ त्या घटनेचे स्मरण करणं नसून प्रदूषणाच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करणं, प्रदूषणावर उपाययोजन करणं आहे.

भोपाळ गॅस दुर्घटना : 2 आणि 3 डिसेंबर 1984 च्या रात्री मध्य प्रदेशातील भोपाळ शहरातील युनियन कार्बाइड कारखान्यातून मिथाइल आयसोसायनेट (MIC) वायूची गळती झाली होती. या विषारी वायूनं ​​हजारो लोकांचा बळी घेतला होता. तसंच अनेकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग बनवलं होतं. या शोकांतिकेनं केवळ भारतातंच नव्हे, तर संपूर्ण जगाला औद्योगिक सुरक्षा आणि प्रदूषण नियंत्रणाचं महत्त्व पटवून दिलंय.

'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसा'चं महत्त्व : हा दिवस आपल्याला पर्यावरणीय प्रदूषणामुळं होणाऱ्या धोक्यांकडं लक्ष वेधून घेतो. तसंच त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रेरित करतो. झपाट्यानं वाढलेलं शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि लोकसंख्या वाढ यामुळं प्रदूषण ही अधिक गंभीर समस्या बनली आहे. वायू, पाणी तसंच ध्वनी प्रदूषणामुळं आपलं निसर्गाचा समतोल बिघडत आहे.

प्रदूषणाबद्दल जागरूकता वाढवणे : लोकांना प्रदूषणाचं दुष्परिणाम समजावून सांगणे. तसंच प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांना शिक्षित करणे.

औद्योगिक सुरक्षिततेवर लक्ष : उद्योगांमध्ये सुरक्षा मजबूत करावी. तसंच धोकादायक वायूंच्या गळतीसारख्या घटना रोखण्यासाठी अधिक उपयांची गरज आहे.

सरकार आणि नागरिकांची भूमिका : प्रदूषण नियंत्रणासाठी धोरणं राबवणं आणि वैयक्तिक स्तरावर त्याची अंमलबजावणी करणं.

प्रदूषण नियंत्रण उपाय :

  • पुनर्वापर : कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी अधिक संसाधनं हवी आहेत.
  • हरित ऊर्जा स्त्रोतांचा वापर : सौर, पवन आणि जल ऊर्जेचा वापर करावा.
  • सार्वजनिक वाहतुकीचा वापर : खाजगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा.
  • औद्योगिक कचरा व्यवस्थापन : उद्योगांनी त्यांच्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केल्यास प्रदूषणाला आळा बसू शकतो.
  • वृक्षारोपण : शक्य तितकी झाडं लावणं हा प्रदूषण कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण : भारत सरकारनं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) ची स्थापना, हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) लागू करणे आणि स्वच्छ भारत अभियान तसंच पर्यावरण संरक्षण कायदे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून जनजागृती आणि नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.

'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' हा केवळ एक दिवस म्हणून न पाहता पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीसाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. पर्यावरण प्रदूषणमुक्त करण्यासाठी योगदान देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

हे वाचलंत का :

  1. दिल्लीत हवेची गुणवत्ता चिंताजनक; थंडीचा कडाका वाढल्यानं नागरिक हवालदिल
  2. प्रदूषित हवा बनली 'जीवघेणी', दिल्लीकरांवर 'या' आजारांची टांगती तलवार
  3. खाण्याच्या ‘या’ सवयीमुळं होऊ शकतं प्रदूषणापासून बचाव

Last Updated : 47 minutes ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.