ETV Bharat / entertainment

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'पुष्पा 2' ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी, पहिल्याच दिवशी 30 कोटींची तिकीट विक्री

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटाने दोन दिवसांत अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये लाखो तिकिटांची विक्री झाली आहे. देशभर तिकीट विक्रीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.

'Pushpa 2'
'पुष्पा 2' ('Pushpa 2' poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 2 hours ago

Updated : 1 hours ago

मुंबई - अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 द रुल' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या रिलीजसाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. याआधी 'पुष्पा 2 द रुल'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 'पुष्पा 2' च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंग 30 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. तिकीट विक्री सुरू झाल्यापासून पहिल्या 48 तासांत 'पुष्पा 2' नं 30 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या आकड्यांमुळे चित्रपट दमदार ओपनिंग घेणार हे उघड झाले आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, राव रमेश, सुनील, अजय घोष, धनंजय आणि प्रताप भंडारी यांच्यासह चित्रपटातील उत्कृष्ट कलाकारांची फौज प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

'पुष्पा २ : द रुल' अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा पहिला दिवस

'पुष्पा 2' च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून समोर आलेल्या कमाईचे आकडे दर्शवतात की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडणार आहे. फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून मिळणारी कमाई वेगाने वाढत आहे. 'पुष्पा 2' ने भारतातील सर्व भाषांमध्ये अंदाजे 7 लाख (6.82 लाख) तिकिटे विकली आहेत. यामध्ये 2D, 3D, IMAX आणि 4D X आवृत्त्यांचा समावेश आहे. पुष्पा 2 ने पहिल्या दिवशी 31.91 कोटींची कमाई केली आहे.

'पुष्पा 2' च्या तेलगू व्हर्जनमध्ये 2,77,542 तिकिटांची विक्री झाली असून चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये 10.87 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी पुष्पा 2 ने हिंदी भाषिक पट्ट्यात खळबळ उडवून दिली आहे. पुष्पा 2 ने हिंदीमध्ये 2,66,083 तिकिटे विकून अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 7.6 कोटी रुपये कमावले आहेत. यावरून हे सिद्ध होते की हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे.

त्याचबरोबर तामिळ आणि कन्नड भाषेमध्येही चित्रपटाला वेग आला आहे. या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे 'पुष्पा 2' चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पेटीएमवर चित्रपटांचे बुकिंग वेगाने होत आहे. या प्लॅटफॉर्मवर 2.6 अब्ज लोकांनी 'पुष्पा 2' साठी तिकिटे बुक केली आहेत. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. पुष्पा 2 या चित्रपटाने केरळमध्ये 12 तासांत प्री-सेल्समध्ये 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'पुष्पा 2' बाबत चाहत्यांमध्ये क्रेझ

'पुष्पा 2' वाइल्डफायर जत्रा हा रिलीज पूर्व इव्हेन्ट आज 2 डिसेंबर रोजी हैदराबाद येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. यानंतर चेन्नई, मुंबई आणि कोचीमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाचे प्रमोशन केले जाणार आहे.

'पुष्पा 2' चे बजेट आणि स्क्रीन्स

'पुष्पा 2' 5 डिसेंबर रोजी जगभरात 12 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट तेलुगूसह हिंदी, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध असेल. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर चित्रपट प्रदर्शित होत आहे. 'पुष्पा 2' चे निर्माते चित्रपट मैत्री मुव्ही मेकर्स आहेत. त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीवर सुमारे 500 कोटी रुपये खर्च केले आहेत. निर्मात्यांचे म्हणणे आहे की चित्रपट आपल्या बजेटच्या दुप्पट पैसे कमावणार आहे.

'पुष्पा 2' छापणार 1000 कोटी रुपये?

'पुष्पा 2' चा पॅड प्रीमियर 4 डिसेंबर रोजी होणार आहे आणि तेलंगणा राज्य सरकारने त्याच्या किंमती वाढवण्यास देखील मान्यता दिली आहे. असे म्हटले जात आहे की अशा प्रकारे 'पुष्पा 2' पहिल्या दिवशी 100 कोटींची कमाई करून विक्रम मोडणार आहे. 2024 मध्ये प्रभास स्टारर चित्रपट 'कल्की 2898 एडी' हा एकमेव चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली होती. आता असे म्हटले जात आहे की 'पुष्पा 2' 'कल्की 2898 एडी'चा रेकॉर्ड मोडणार आहे.

Last Updated : 1 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.