नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या यूके-इंडिया टेक भागीदारीच्या अनुषंगाने ब्रिटनने सोमवारी कोविड -१९ आणि हवामान बदल अभ्यासासाठी शिक्षण व उद्योग क्षेत्रातील संशोधकांसाठी ३ मिलियन पौंडाचा इनोव्हेशन चॅलेंज फंड जाहीर केला. दिल्ली येथील ब्रिटीश उच्चायोगाने जारी केलेल्या निवेदनानुसार, कोविड -१९ विरोधात लढा देणाऱ्या किंवा ग्रीन प्लॅनेटला बढावा देणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित आणि कर्नाटकातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) डाटा क्लस्टरशी संबंधित आणि महाराष्ट्रातील फ्युचर मोबिलिटी क्लस्टरशी संबंधित टेक इनोव्हेटर्सना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“२.५ लाख पौंडापर्यंतची किमान १२ ग्रँट्स / अनुदान दिले जाणे अपेक्षित आहे,” असे उच्च आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे. अर्जदारांना आंतरराष्ट्रीय- सदस्यासमवेत शैक्षणिक -औद्योगिक आधारित प्रोजेक्ट्स प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.
आपली संकल्पना दोन पानी नोट्समध्ये सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. "ब्रिटन आणि भारताला नावीन्य आणि संशोधनाचा समृद्ध असा इतिहास आहे,” असे ब्रिटनचे उच्चायुक्त फिलिप बार्टन यांनी निवेदनात म्हटले आहे. “जागतिक पातळीवर कोविड-१९ आणि हवामान बदल ही सर्वात महत्त्वाची आव्हाने आहेत. शैक्षणिक संस्था, उद्योग जगात ,सरकार आणि राष्ट्रांना एकत्रित मिळून नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आणि चांगले भविष्य घडविण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सहकार्य करण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे."
ब्रिटीश हाय कमिशनमधील यूके-इंडिया टेक पार्टनरशिपचे प्रमुख कॅरेन मॅकलस्की म्हणाले की, कोरोना विषाणू तसेच जागतिक पातळीवरील धोका: हवामान बदल याविषयावर काम करीत असलेल्या ध्येयवादी संशोधकांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी या फंडाची स्थापना करण्यात आली आहे.
-
The UK Government has launched a £3 million Innovation Challenge Fund in AI & Data and Future Mobility to tackle the most acute global challenges of our time: #COVID19 and #ClimateChange.
— UK in India🇬🇧🇮🇳 (@UKinIndia) August 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
To learn more and apply for the fund: https://t.co/iMYQFxgOEs #BuildBackBetter pic.twitter.com/AtRXoHAtRJ
">The UK Government has launched a £3 million Innovation Challenge Fund in AI & Data and Future Mobility to tackle the most acute global challenges of our time: #COVID19 and #ClimateChange.
— UK in India🇬🇧🇮🇳 (@UKinIndia) August 17, 2020
To learn more and apply for the fund: https://t.co/iMYQFxgOEs #BuildBackBetter pic.twitter.com/AtRXoHAtRJThe UK Government has launched a £3 million Innovation Challenge Fund in AI & Data and Future Mobility to tackle the most acute global challenges of our time: #COVID19 and #ClimateChange.
— UK in India🇬🇧🇮🇳 (@UKinIndia) August 17, 2020
To learn more and apply for the fund: https://t.co/iMYQFxgOEs #BuildBackBetter pic.twitter.com/AtRXoHAtRJ
"सर्वांच्या हितासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञान आत्मसात करण्यात आणि विकास करण्यात जागतिक पातळीवरील जुळे नैतृत्व म्हणून भारताबरोबर काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे," असे देखील त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांच्यात एप्रिल २०१८ मध्ये लंडन दौऱ्यादरम्यान झालेल्या बैठकीनंतर ब्रिटन आणि भारताने यूके-इंडिया टेक भागीदारी स्थापनेची घोषणा केली होती.
तंत्रज्ञान आणि व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्य वाढविण्यावर भर देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ही भेट दिली होती. भारतीय आयटी आणि बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग (बीपीओ) उद्योगांची व्यापारी संघटना नॅसकॉम आणि टेक यूके यांच्यात युके-इंडिया टेक अलायन्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, युके-इंडिया टेक हब निर्माण करणे, यूके-इंडिया टेक क्लस्टर भागीदारी विकसित करणे आणि डिजिटल हेल्थकेअरच्या सहयोगाने भारतातील महत्वाकांक्षी आरोग्य जिल्हे कार्यक्रमात सहयोग देणे यांचा या धोरणात समावेश आहे.
ब्रिटिश व भारतीय उद्योजक व लघु व मध्यम उद्योजकांना बाजारपेठेत प्रवेश मिळविण्यासाठी मार्ग सुकर व्हावा त्याचबरोबर व्यवसाय, व्हेंचर कॅपिटल, विद्यापीठे यांच्या माध्यमातून जोडणे ही यूके-इंडिया टेक भागीदारीमागील कल्पना आहे. २०२२ पर्यंत ब्रिटन भारतात १४ मिलियन पौंडपर्यंतची गुंतवणूक करेल.
सुरुवातीला, पायलट प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्रातील पुणे आणि ब्रिटन जोडले जाऊन फ्युचर मोबिलिटी अंतर्गत कमी उत्सर्जन करणारी आणि स्वायत्त वाहने, बॅटरी स्टोरेज आणि हलक्या वजनाच्या वाहनांवर लक्ष केंद्रित करेल. त्यानंतर पुढच्या टप्प्यात ऑगमेंटेड अँड व्हर्च्युअल रिएलिटी, एआय आणि इतर प्रगत तंत्रज्ञानाशी संबंधित विकासासाठी बंगळुरू जोडले जाईल.
नवीन इनोव्हेशन चॅलेंज फंडासंदर्भात ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाने जारी केलेल्या संकल्पनात्मक निवेदनांनुसार (कॉन्सेप्ट नोटनुसार), कोविड -१९ प्रतिसाद आणि पुनर्प्राप्ती आणि हवामान बदल किंवा पर्यावरण संरक्षणाच्या संबंधी प्राथमिक निकषांची पूर्तता करण्यासाठी आणि खालील आव्हानांची पूर्तता करण्यासाठी प्रस्ताव मागितले जात आहेत.
सुरक्षितता आणि सुविधा (जसे की सामायिक आणि सार्वजनिक वाहतुकीत स्वच्छता / हायजिन / सामाजिक अंतर, संपर्क विरहित वितरण); असामान्य तंत्रज्ञान (जसे की नवीन ऊर्जा, आवश्यक / वैद्यकीय पुरवठा तापमान नियंत्रित वाहतूक, ड्रोन गतिशीलता); कनेक्टिव्हिटी (जसे की शेवटच्या घटकापर्यंत (फर्स्ट टू लास्ट माईल) आरोग्य सेवा वितरण, लॉजिस्टिक्स आणि सर्व्हिस डिलिव्हरीसाठी मायक्रो मोबिलिटी); उर्जा संक्रमण (जसे अंतर्गत ज्वलन इंजिन किंवा ICE विद्युतीकरण, हायड्रोजन इंधन सेल, उर्जा कार्यक्षमता); आणि स्मार्ट मोबिलिटी (जसे इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टम, ट्रिप रीपर्पजिंग टेक, डिमांड-सप्लाय मॅचिंग).
वरील अटी आणि शर्थींमध्ये न बसणाऱ्या परंतु भविष्यातील मोबिलिटीवर आधारित आणि हवामान बदल व पर्यावरणीय उद्दिष्टांशी संबंधित तसेच कोविड -१९चा प्रसार रोखण्याची उद्दिष्टपूर्ती करणारे तंत्रज्ञानाचा आंतरराष्ट्रीय व्यापार विभाग देखील विचार करेल असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
- अरुणिम भुयान