नवी दिल्ली - चिनी कंपनी पब्जीला पर्याय ठरू शकणाऱ्या भारतीय फौजी (एफएयू-जी) व्हिडिओ गेम प्रजासत्ताक दिनाला लाँच झाला आहे. ही माहिती कंपनीने ट्विट करून दिली आहे.
फौजी गेममध्ये भारतीय कंमाडो दाखविण्यात आले आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने हा गेम समाज माध्यमात लाँच केला आहे. त्यावरील अॅनिमेटेड व्हिडिओही लाँच केला आहे.
या व्हिडिओमध्ये भारतीय कंमाडो हे सीमावर्ती भागात गस्त घालताना दिसत आहेत. यामध्ये देशाचे शत्रु हे भारतीय सीमेवर येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामध्ये व्हिडिओ गेम खेळणाऱ्याला देशभक्ती जवानासारखे शौर्य गाजविण्याचा अनुभव घेता येतो. हा व्हिडिओ गेम हा एन कोअर गेम्सचा प्रकल्प आहे. कंपनीने भारतीय सशस्त्र दलाला हा गेम समर्पित केला आहे.
हेही वाचा-टिकटॉक अखेर देशातून गुंडाळणार गाशा
या गेममधून रोमांचक अनुभव येत असल्याचे कंपनीनेच म्हणणे आहे. नुकतेच अभिनेता अक्षय कुमारने आत्मनिर्भर भारत प्रकल्पांतर्गत सप्टेंबर २०२० मध्ये फौजी गेम्सची घोषणा केली होती. पब्जीवर बंदी लागू केल्यानंतर ही घोषणा झाल्याने अनेकजण या गेमची वाट पाहत होते.
हेही वाचा-शेअर बाजारात दिवसाखेर ९३८ अंशांची पडझड; निफ्टी १४,०००हून खाली