नवी दिल्ली - मुलांनी इंटरनेटवर किती वेळ व काय सर्च पाहिले, याची माहिती पालकांना कळू शकणार आहे. त्यासाठी गुगलने फॅमिलीज गुगल हे वेबसाईटसुरू केली आहे. या वेबसाईटच्या मदतीने मुलांच्या इंटरनेटवर सर्चवर नियंत्रण ठेवणे पालकांना शक्य होणार आहे.
पाचपैकी दोन पालकांना मुलांशी तंत्रज्ञानाशी संबंधित बोलण्यासाठी विश्वास नसतो. यामध्ये स्क्रीन टाईम, डिजीटल वेलबेईंग आणि डिस्कव्हरिंग क्वालिटी अॅप, गेम्स आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. नवीन वेबसाईटमध्ये मुलांना तंत्रज्ञानाचा वापर करून देण्यासाठी पालकांकरिता माहिती दिली आहे. त्याचबरोबर लहान मुलांबरोबर आणि कुटुंबांशी निगडीत अॅप आणि सेवा आहेत. त्यामुळे पालकांना वेबसाईटवर नियंत्रण ठेवणे शक्य होत असल्याचे गुगलने म्हटले आहे. ज्या अॅपला परवानगी दिली आहे, त्यासाठी पालक मुलांना प्रोत्साहन देऊ शकतात.
हेही वाचा-शेअर बाजारात दिवसाखेर ५८५ अंशाने पडझड; टीसीएसच्या शेअरमध्ये घसरण
मुलांबाबतची माहिती लगेच कळू शकणार-
पालकांना मुलांनी वापरलेल्या अॅप व इंटरनेट वेबसाईटच्या वापराबाबतचा दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक अहवाल दिसू शकतो. यामधून मुले अॅपमध्ये किती वेळ घालवितात हे समजू शकणार आहे. गतवर्षी पाचपैकी तीन पालकांनी मुलांना स्क्रीन पाहण्याच्या वेळेत वाढ करून दिली आहे. कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण माहिती देण्यावर काम सुरू असल्याचे गुगलने म्हटले आहे. पुढील महिन्यापासून हेडस्पेस ब्रीथर्स सिरीज ही युट्यूब आणि युट्युब किड्समध्ये सुरू होणार असल्याचे गुगलने म्हटले आहे.
हेही वाचा-एलईडी टीव्हीच्या एप्रिलमध्ये वाढणार किमती