टेक डेस्क - यू-ट्यूब आजच्या काळात सर्वात मोठे व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायचा असेल तर यू-ट्यूबमध्ये केवळ कि-वर्ड टाका आणि लगेच त्याच्याशी संबंधित सर्व व्हिडिओ तुम्हाला क्षणात स्क्रीनवर दिसणार. दिवसेंदिवस याच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.
मात्र तुम्हाला माहिती आहे का जे तुम्ही सर्च करता त्याची सर्व माहिती गुगलकडे असते. हे टाळायचे असले तर तुम्हाला सेटिंग्स ऑप्शनमध्ये जावे लागेल. जर तुम्ही अँड्राईड, टॅबलेट, आयफोन आणि वेबवर यू-ट्यूबचे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही सर्च आणि वॉच हिस्ट्री क्लिअर करू शकता.
डेस्कटॉप वर असे करा डिलीट
सर्वप्रथम यू-ट्यूब ओपन करा. त्यानंतर अकाउंटमध्ये साईन इन करा. लेफ्ट हँड कॉर्नरमध्ये जाउन हिस्ट्रीवर क्लिक करा. मेनूमध्ये जाऊन वॉच हिस्ट्रीचा ऑप्शन निवडा. यानंतर तुमच्यासमोर हिस्ट्री डिलीट करण्याचा ऑप्शन X या आयकॉनच्या रुपात दिसणार. याच्या सहाय्याने तुम्ही सर्व हिस्ट्री एकाचवेळेस डिलीट करू शकता.
सर्च हिस्ट्री कशी करणार डिलीट
यू-ट्यूबला ओपन करा. अकाउंटमध्ये साईन इन करा. लेफ्ट हँड कॉर्नरमध्ये जाऊन हिस्ट्रीवर क्लिक करा.
- राईट साईडमध्ये मेनू वर क्लिक करुन सर्च हिस्ट्री निवडा. त्या मेन्यूमध्ये जाऊन पूर्ण सर्च हिस्ट्री डिलीट करा.
अँडॉईड आणि iOS वर कसे करणार डिलीट
- यू-ट्यूब अॅप ओपन करा. त्यानंतर लायब्ररी निवडा आणि हिस्ट्रीवर टॅप करा. यानंतर तुम्हाला वॉच व्हिडिओची लिस्ट दिसणार. याच्या मदतीने तुम्ही संपूर्ण हिस्ट्री डिलीट करू शकता. तर अँड्रॉईड युझर्सला तीन डॉटवर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर वॉच हिस्ट्री डिलीट करावी लागणार. iOS युझर्सला व्हिडिओ लेफ्ट स्वाईप करुन रिमूव्ह वर क्लिक करावे लागेल.