सॅनफ्रान्सिस्को - अध्यक्षपदाच्या काळात नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना गुगलने झटका दिला आहे. प्ले स्टोअरवरून डोनाल्ड ट्रम्प यांचे कॅम्पेन अॅप काढून टाकण्यात आले आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अॅपमध्ये काहीही माहिती दिसत नसल्याचे एका अँड्राईड अॅपविषयी माहिती देणाऱ्या अॅपने म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे कॅम्पेन अॅप हे अँड्राईड आणि आयओएस या दोन्ही व्हर्जनमधून सुरू होते. हे अॅप डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी सुरू करण्यात आले होते.
प्ले स्टोअरवर या अॅपमध्ये ३० ऑक्टोबरपासून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. गुगलच्या प्रवक्त्याने म्हटले की, ट्रम्प २०२० कॅम्पेन अॅप हे नुकतेच बंद पडले आहे. आम्ही अनेकदा डेव्हलपरशी संपर्क साधून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. गुगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड केलेल्या अॅपमधून कमीत कमी आवश्यक असलेली माहिती मिळावी, अशी अपेक्षा आहे. सक्रिय नसलेले अॅप काढून टाकण्याचे आमचे धोरण आहे.
हेही वाचा- कर्मचाऱ्यांना लस देण्याकरता परवानगी द्या-सीआयआयची केंद्राला विनंती
दरम्यान, ट्रम्प २०२० कॅम्पेन अॅप हे आयओएसमध्ये दिसत आहे. गुगलप्रमाणे अॅपलने ट्रम्प यांचे अॅप स्टोअरमधून काढलेले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत पराजय झाल्यानंतर निवडणुकीच्या मतदान मोजणी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा-इंधन दरवाढीची परभणीला राज्यात सर्वाधिक झळ; नागरिक संतप्त