पुणे - शहरासह परिसरात वाहन चोरीसह घरफोड्या करणाऱ्या सराईत टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. या टोळीतील तिघांनी मिळून १०० पेक्षा अधिक गुन्हे केल्याची माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ मोटारी, ५ दुचाकी, ३३ महागडे मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून ३८ लाख १३ हजारांचा ऐवज जप्त केला.
पोलिसांना अटकेतील आरोपींकडून २१ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. कन्वरसिंग कालुसिंग टाक (वय २०, रा. हडपसर), अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (वय २० रा. मांजरी बुद्रूक) आणि जयसिंग कालूिंसग जुनी (वय २७, रा. वैदुवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा-भन्नाट! भारतीय भाषांमध्ये मोफत डोमेन रजिस्टर करता येणार
हडपसर पोलिसांचे गुन्हे प्रतिबंधक पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना चोरीचे महागडे मोबाईल आणि सोन्याचे दागिने विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा दुचाकीस्वारांची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना पकडले. त्यांच्याकडे दुचाकी, सोन्याची चेन व ७ मोबाईल आढळले. चौकशीत त्यांनी हडपसर, कात्रज, शिक्रापूर, ठाणे, कल्याण परिसरात घरफोडी, वाहनचोरी केल्याची कबुली दिली. त्याशिवाय पोलिसांनी त्यांच्याकडून वाहनचोरीच्या १७ गुन्ह्यांसह २१ गुन्ह्यांची उकल केली.
हेही वाचा-स्टेट बँकेकडून गृहखरेदी करणाऱ्यांना दिलासा; व्याज दरात कपात