ETV Bharat / international

Akshardham Hindu Temple : जगातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाच्या हिंदू मंदिराचं अमेरिकेत होणार उद्घाटन - स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर

World Largest Akshardham Hindu Temple : न्यू जर्सीमधील BAPS स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरांच येत्या 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. हे जगातील सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं हिंदू मंदिर असणार आहे.

Akshardham Hindu Temple
Akshardham Hindu Temple
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 5:05 PM IST

Updated : Sep 24, 2023, 10:51 PM IST

रॉबिन्सविले (न्यू जर्सी) World Largest Akshardham Hindu Temple : भारताबाहेर बांधण्यात आलेल्या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचं न्यू जर्सीत 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. BAPS (बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था) स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचं बांधकाम रॉबिन्सविले टाऊनशिप, न्यू जर्सी येथे, 2011 साली सुरू झालं होतं. या बांधकामांत 12 हजार 500 स्वयंसेवकांनी मदत केली होती. मंदिराचे औपचारिक उद्घाटन होण्यापूर्वीच येथे दररोज हजारो लोक दर्शनासाठी येत आहेत. अधरधाम म्हणून ओळखलं जाणारं मंदिर 183 एकर परिसरात बांधण्यात आलंय.

जगातील दुसरं सर्वात मोठे मंदिर : हे मंदिर प्राचीन हिंदू धर्मग्रंथांनुसार बांधलं गेलंय. या मंदिरात 10 हजार शिल्पं पुतळे, भारतीय संगीत वाद्यं, नृत्य प्रकारांसह प्राचीन भारतीय संस्कृतीचं चित्रण करण्यात आलं आहे. हे मंदिर कंबोडियातील अंगकोर वाट नंतरचं दुसरं सर्वात मोठे मंदिर आहे. 12व्या शतकात बांधलेलं अंगकोर वाट मंदिर, 500 एकरमध्ये पसरलेले जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. याला युनेस्कोनं (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषिते केलंय. नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिर 100 एकरावर बांधलं आहे. ते 2005 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं होतं.

BAPS स्वामीनारायण संस्थेचे अक्षरवत्सलदास स्वामी एका मुलाखतीत म्हणाले, "आमच्या अध्यात्मिक गुरूंची प्रमुख इच्छा होती की, पश्चिम गोलार्धात सर्वांसाठी एक मंदिर असाव. हे मंदिर फक्त हिंदू, किंवा जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी या मंदिराचं निर्माण करण्यात आलं आहे. हे ठिकाण संपूर्ण मानवजातीच्या कल्यानासाठी असलायला हवं. जिथे लोक येऊन हिंदू परंपरेतील काही मूल्ये, शिकू शकतील.'' त्यांच्या संकल्पानुसार, हे अक्षरधाम पारंपारिक हिंदू मंदिर स्थापत्य रचनेनुसार बांधण्यात आलं आहे.'' या मंदिराचं औपचारिक उद्घाटन ८ ऑक्टोबरला होणार असून १८ ऑक्टोबरपासून ते सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे.

हेही वाचा -

  1. Gold Donation To Saibaba : साईमंदिराचा कलश आतूनही सुवर्णमय, हैदराबादच्या साईभक्तानं पुन्हा दिलंय भरीव सुवर्णदान
  2. Ganesh Festival 2023 : पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष; ढोल ताशांचा गजर करत बाप्पाचं दिमाखात आगमन... पहा व्हिडिओ
  3. Ganesh Chaturthi २०२३ : यमराजानं स्थापित केलेला 'आशापूरक गणपती'; जाणून घ्या आख्यायिका

Last Updated : Sep 24, 2023, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.