ETV Bharat / international

Turkey Earthquake : तुर्कीमध्ये पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के , 3 ठार, 213 जखमी - तुर्कीमध्ये भूकंप

दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या भीषण भूकंपातून तुर्की अजूनही सावरला नसताना आज तेथे पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. तुर्कीच्या दक्षिणी हते प्रांतात स्थानिक वेळेनुसार 20.04 वाजता भूकंप झाला.

Turkey Earthquake
तुर्की भूकंप
author img

By

Published : Feb 21, 2023, 9:32 AM IST

तुर्की : दक्षिण तुर्कीमध्ये पुन्हा एकदा दोन मोठे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर यांची तीव्रता 6.4 आणि 5.8 इतकी मोजली गेली. तुर्कीमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. भूकंपात किमान 3 लोकांचा मृत्यू झाला असून 213 जण जखमी झाले आहेत.

तीन मिनिटांच्या अंतरावर दोन भूकंप : मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुर्कीच्या दक्षिणी हते प्रांतात स्थानिक वेळेनुसार 20.04 वाजता भूकंप झाला. याची तीव्रता 6.4 होती. तीन मिनिटांनंतर दुसरा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 5.8 एवढी मोजली गेली. तुर्कीमध्ये तीन ठिकाणी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पहिला भूकंप 16.7 किमी (10.4 मैल) खोलीवर आला, तर दुसरा 7 किमी (4.3 मैल) खोलीवर होता. दोन्ही भूकंपाचे पडसाद आजूबाजूच्या परिसरात उमटले आहेत.

मदत आणि बचाव कार्य सुरु : दोन आठवड्यांपूर्वी 6 फेब्रुवारीला तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपात आत्तापर्यंत 44 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हातेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या कहानमारसमध्ये हा भूकंप झाला होता. तुर्की अजुनही मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. अद्यापही मदत आणि बचाव पथक अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकलेले नाही. विविध देशांचे मदत आणि बचाव पथक युद्धपातळीवर बचाव कार्यात गुंतले आहेत.

जगभरातून मदतीचा ओघ : भूकंपग्रस्त भागात भूकंपामुळे मूलभूत संसाधने नष्ट झाली असून पाणी, वीज या सुविधा ठप्प झाल्या आहेत. लोकांन पिण्यायुक्त पाणी मिळणे अवघड झाले आहे. दुसऱ्या देशांतून बाटलीबंद पाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इस्त्रायलने खराब पाणी स्वच्छ करून ते पिण्यायोग्य बनवणारे फिल्टर तुर्कीला पुरवले आहेत. भारत सरकारकडून दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर मदत सामग्री पोहोचवण्यात आली आहे. एनडीआरएफचे मदत पथकाने येथे अनेक लोकांचे प्राण वाचवले आहे.

आत्तापर्यंतचा सर्वात विनाशक भूकंप : तुर्कीत आलेला हा भूकंप 19 39 पासून सर्वात शक्तिशाली होता. 7.8-रिश्टर स्केलचा हा भूकंप या दशकातील सर्वात प्राणघातक भूकंप ठरू शकतो. तुर्की हा देश जगातील सर्वात सक्रिय भूकंप झोनमध्ये येतो. 1999 मध्ये उत्तर तुर्कीच्या डुझेच्या प्रदेशात उत्तर अनाटोलियन फॉल्ट लाइनवर भीषण भूकंप आला होता. या भूकंपात तब्बल 17,000 हून अधिक लोक मारले गेले होते.

हेही वाचा : Surprise Visit Of Joe Biden To Kyiv : रशिया युक्रेन युद्ध! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अचानक युक्रेनला भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.