काबूल (अफगाणिस्तान) : शहरातील शिया बहुल परिसरात मंगळवारी मुलांच्या शाळेत झालेल्या बाँब हल्ल्यात सहा जण ( Multiple Blasts near Kabul School) ठार तर 11 जण जखमी झाले. राजधानीच्या पश्चिमेकडील दश्त-ए-बर्ची येथील अब्दुल रहीम शाहिद हायस्कूलमध्ये हा स्फोट झाला, असे काबूल पोलिस कमांडचे प्रवक्ते खालिद झदरन यांनी सांगितले. मात्र, या हल्ल्यात किती मुले जखमी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
-
Six people killed, dozens injured as 2 blasts hit near schools in western Kabul
— ANI Digital (@ani_digital) April 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/BtAGfu6c39#Afghanistan #Kabul #Kabulblasts pic.twitter.com/vCQSZ6Gcr6
">Six people killed, dozens injured as 2 blasts hit near schools in western Kabul
— ANI Digital (@ani_digital) April 19, 2022
Read @ANI Story | https://t.co/BtAGfu6c39#Afghanistan #Kabul #Kabulblasts pic.twitter.com/vCQSZ6Gcr6Six people killed, dozens injured as 2 blasts hit near schools in western Kabul
— ANI Digital (@ani_digital) April 19, 2022
Read @ANI Story | https://t.co/BtAGfu6c39#Afghanistan #Kabul #Kabulblasts pic.twitter.com/vCQSZ6Gcr6
एका सुरक्षा अधिकाऱ्याने जर्मन वृत्तसंस्था डीपीएला सांगितले की, हे बॉम्बस्फोट हातबॉम्बने केले आहेत. आतापर्यंत कोणत्याही गटाने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाळा राजधानीच्या पश्चिम भागात दश्त-ए-बर्ची येथे आहे. यापूर्वी इस्लामिक स्टेट गटाने लक्ष्य केले होते. या बॉम्बस्फोटात आमचे शिया बांधव मारले गेल्याचे काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद झदरन यांनी ट्विटरवर सांगितले.
याआधीही झालेला स्फोट
तालिबानच्या अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, तपास पथकाने घटनास्थळी काम सुरू केले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विद्यार्थी सकाळच्या वर्गातून बाहेर पडत असताना हा स्फोट झाला. याआधीही मे 2021 मध्ये, अफगाणिस्तानच्या राजधानीच्या भागात एका शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 85 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - Russia-Ukraine War : रक्तरंजित संघर्ष! रशिया-युक्रेन युध्द अधिक तीव्र; लिव्हमध्ये 7 ठार