टोरंटो (कॅनडा): बुधवारी कॅनडातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली ( Mahatma Gandhi Statue Vandalized In Canada ) आहे. या गुन्ह्यामागील गुन्हेगारांची ओळख अद्याप पटलेली नाही. रिचमंड हिल परिसरातील विष्णू मंदिरात असलेल्या या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे.
टोरंटोमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाने ( Consulate General of India in Toronto Canada ) या प्रकरणाची दखल घेत गुरुवारी ट्विटरवर या विषयावर आपली चिंता व्यक्त ( embassy demands action ) केली. ज्यामुळे कॅनडामधील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचे अधोरेखित केले. ट्विटमध्ये असेही सूचित करण्यात आले आहे की, भारतीय दूतावासाने द्वेषपूर्ण गुन्ह्याच्या चौकशीची मागणी करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.
-
We are distressed at the desecration of Mahatma Gandhi statue at Vishnu temple in Richmond Hill. This criminal, hateful act of vandalism has deeply hurt the sentiments of the Indian community in Canada. We are in contact with Canadian authorities to investigate this hate crime.
— IndiainToronto (@IndiainToronto) July 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We are distressed at the desecration of Mahatma Gandhi statue at Vishnu temple in Richmond Hill. This criminal, hateful act of vandalism has deeply hurt the sentiments of the Indian community in Canada. We are in contact with Canadian authorities to investigate this hate crime.
— IndiainToronto (@IndiainToronto) July 13, 2022We are distressed at the desecration of Mahatma Gandhi statue at Vishnu temple in Richmond Hill. This criminal, hateful act of vandalism has deeply hurt the sentiments of the Indian community in Canada. We are in contact with Canadian authorities to investigate this hate crime.
— IndiainToronto (@IndiainToronto) July 13, 2022
"रिचमंड हिल येथील विष्णू मंदिरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे आम्ही व्यथित झालो आहोत. तोडफोडीच्या या गुन्हेगारी, घृणास्पद कृत्यामुळे कॅनडातील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या द्वेषपूर्ण गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी आम्ही कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.,' असे भारतीय दूतावासाने ट्विटरवर म्हटले आहे.
हेही वाचा : Gandhi Jayanti 2021 : महात्मा गांधीजींची कधीही न पाहिलेली दुर्मीळ छायाचित्रे... पाहा एका क्लिकवर