ETV Bharat / international

Temple Vandalize In Australia : ऑस्ट्रेलियात पुन्हा मंदिराची तोडफोड, खलिस्तान समर्थकांनी केला हल्ला

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये खलिस्तान समर्थकांनी श्री लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यातही अशाप्रकारची घटना उघडकीस आली होती.

Temple Vandalize In Australia
ऑस्ट्रेलियात मंदिराची तोडफोड
author img

By

Published : Mar 4, 2023, 12:58 PM IST

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियातील श्री लक्ष्मी नारायण मंदिरावर खलिस्तान समर्थकांकडून आणखी एकदा हल्ला करण्यात आला आहे. खलिस्तानी समर्थकांनी मंदिराची तोडफोड केली आणि भारतविरोधी घोषणा देखील लिहिल्या आहेत.

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न : स्थानिक मीडियाशी बोलताना मंदिराचे अध्यक्ष सतींदर शुक्ला म्हणाले, 'मंदिराच्या पुजारी आणि भाविकांनी आज सकाळी फोन करून मला आमच्या मंदिराच्या भिंतीच्या तोडफोडीची माहिती दिली. हिंदू ह्युमन राइट्सच्या संचालिका सारा गेट्स म्हणाल्या, 'हा गुन्हा जागतिक स्तरावर शिख फॉर जस्टिस (SFJ) च्या पॅटर्नचे अनुसरण करतो, जो ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. विविध मार्गांनी बेकायदेशीर चिन्हांच्या सहाय्याने हिंदुविरोधी मोहीम राबविण्याचा या संस्थेचा मानस आहे.

यापूर्वीही घडल्या आहेत घटना : यापूर्वी जानेवारी महिन्यातही ऑस्ट्रेलियातील कॅरम डाऊन्स येथील श्री शिव विष्णू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. त्याचबरोबर भिंतींवर हिंदूविरोधी चित्रे देखील काढली गेली होती. स्थानिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, 'ऑस्ट्रेलियातील तमिळ हिंदू समुदायाने तीन दिवसीय थाई पोंगल सणा साजरा केल्‍यानंतर 16 जानेवारी रोजी भक्तांनी मंदिराला भेट दिली तेव्हा हे कृत्य उघडकीस आले. 15 जानेवारी 2023 च्या संध्याकाळी, खलिस्तान समर्थकांनी मेलबर्नमध्ये कार रॅलीद्वारे त्यांच्या सार्वमतासाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यासाठी दोनशेहून कमी जण जमा झाले होते.

स्वामीनारायण मंदिरावर हल्ला : वरील घटनेच्या एक आठवडा आधी, 12 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियातील मिल पार्कमधील स्वामीनारायण मंदिरातील भिंतींवर भारतविरोधी आणि हिंदूविरोधी चित्रे काढली गेली होती. तसेच मंदिरात भारतविरोधी घोषणा देत काही घटकांकडून मंदिराची तोडफोड देखील करण्यात आली होती. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पटेल यांनी सांगितले की, त्यांनी घटनास्थळाला भेट दिली तेव्हा त्यांना मंदिराच्या ढासळलेल्या भिंती दिसल्या.

परराष्ट्र मंत्रालयाची कारवाईची मागणी : परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आश्वासन दिले की, ऑस्ट्रेलियातील वाणिज्य दूतावासाने स्थानिक पोलिसांकडे हे प्रकरण उचलले आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोघांनीही हे प्रकरण ऑस्ट्रेलियन सरकारकडे लावून धरले आहे. या प्रकरणी कारवाईची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा : Anthony Albanese Visit To India : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज येणार भारत दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.