ETV Bharat / international

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात जखमी - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, इम्रान खान या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात जखमी

author img

By

Published : Nov 3, 2022, 5:16 PM IST

Updated : Nov 3, 2022, 6:17 PM IST

वजिराबाद - येथे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, इम्रान खान या हल्ल्यात जखमी झाले आहेत. वजिराबाद हे लाहोरच्या उत्तरेस सुमारे १०० किलोमीटरवर चिनाब नदीच्या काठावर वसलेले आहे.

  • #UPDATE | PTI Senator Faisal Javed injured following the attack on PTI's camp. Image shows suspected assailant firing a gunshot near the PTI camp: Pakistan's Geo English

    (Photo courtesy - Geo English) pic.twitter.com/mf8kYHtLI8

    — ANI (@ANI) November 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

खान यांच्याशिवाय आणखी चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आझादी मार्च - इम्रान खान सध्या पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य मोर्चा काढत आहेत. ते सध्याच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तोषखाना प्रकरणात इम्रान दोषी आढळल्यापासून त्याच्या वतीने आझादी मार्च सुरू करण्यात आला आहे. यामध्ये गुरुवारी त्यांची स्वातंत्र्ययात्राही काढण्यात आली. मात्र यावेळी गोळीबार झाला. त्यात इम्रान खान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात त्यांच्याशिवाय माजी गव्हर्नर इम्रान इस्माईल हेही जखमी झाले आहेत.

  • #WATCH | A firing occurred near the container of former PM and Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) chairman Imran Khan near Zafar Ali Khan chowk in Wazirabad today. Imran Khan sustained injuries on his leg; a man who opened fire has been arrested.

    (Video Source: Reuters) pic.twitter.com/Qe87zRMeEK

एके ४७ रायफलमधून गोळीबार झाल्याचा दावा - या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात त्यांच्याशिवाय पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अनेक नेते जखमी झाले आहेत. फवाद चौधरीच्या म्हणण्यानुसार, इम्रान खान यांच्यावर एके ४७ रायफलमधून गोळीबार करण्यात आला आहे. मात्र पाकिस्तानी माध्यमात आलेल्या फोटोमध्ये एक तरुण पिस्तूलमधून गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या पायाला गोळी लागली आहे.

काय आहे प्रकरण - इम्रान खान ज्या प्रकरणाचा निषेध करत आहेत ते 2018 सालचे आहे. तर तोषखाना प्रकरणी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे संसद सदस्यत्व रद्द केले. खान यांच्यावर पंतप्रधान असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंची खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. वास्तविक इम्रान खान 2018 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. अरब देशांच्या दौऱ्यांमध्ये त्यांना तेथील राज्यकर्त्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या. अनेक युरोपीय देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडून अनमोल भेटवस्तूही मिळाल्या होत्या. ज्या इम्रान यांनी तोशाखान्यात जमा केल्या होत्या. पण नंतर इम्रान खान यांनी तोशाखान्यातून स्वस्तात विकत घेतल्या आणि मोठ्या नफ्यात विकल्या. त्यांच्या सरकारने या संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर परवानगी दिली होती. इम्रानने एकूण ५.८ कोटींचा नफा कमावल्याचा आरोप होता. या प्रकरणी इम्रानचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Last Updated : Nov 3, 2022, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.