काठमांडू (नेपाळ): नेपाळमध्ये आज सकाळी यति एअरलाईन्सचे विमान कोसळले. या विमानात 68 प्रवासी होते. विमानात अनेक भारतीयही होते. चार क्रू मेंबर्स होते. नेपाळमधील पोखरा विमानतळावर हा अपघात झाला. एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, आतापर्यंत एकाही जिवंत व्यक्तीला बाहेर काढण्यात आलेले नाही. यति एअरलाइन्सचे एटीआर-72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरामध्ये कोसळले. या अपघातापूर्वीही नेपाळमध्ये अनेक मोठे विमान अपघात झाले आहेत. यापूर्वी झालेल्या अपघातांवर एक नजर टाकूयात.
काठमांडूहून पोखराला जाणारे यती एअरलाइन्सचे विमान क्रॅश झाल्याची माहिती नेपाळी माध्यमांकडून मिळाली आहे. विमानात 68 प्रवासी होते. पश्चिम नेपाळमधील पोखरा येथे रविवारी झालेल्या विमान अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, शेकडो बचाव कर्मचार्यांनी डोंगरावरील अपघातस्थळाचा शोध घेतला. कृष्णा भंडारी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्हाला आणखी मृतदेह मिळण्याची आशा आहे. विमानाचे तुकडे झाले आहेत.
- US Bangla Airlines 211 क्रॅश : हे विमान ढाकाहून बांगलादेशची राजधानी काठमांडूला जात होते. लँडिंगच्या वेळी विमान कोसळले. या अपघातात 51 जणांचा मृत्यू झाला होता. विमानात 71 जण होते. हा अपघात 2018 चा आहे. नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला.
- तारा विमान अपघात 193 : हे विमान पोखराहून नेपाळमधील जोमसोमला जात होते. टेक ऑफ करण्यासाठी 10 मिनिटे विमान आतल्या रडारवरून गायब झाले. विमानात 23 जण होते. सर्वांचा मृत्यू झाला होता. हा अपघात फेब्रुवारी 2016 चा आहे.
- सीता एअर फ्लाइट 601 अपघात : काठमांडू विमानतळावरून विमानाने उड्डाण करताच विमानात बिघाड झाला. त्याचे लँडिंग झाले, मात्र लँडिंगदरम्यानच हा अपघात झाला. या विमानात १९ जण होते. सर्वजण मरण पावले. हा अपघात 2012 चा आहे.
- अग्नि एअर डॉर्नियर 228 क्रॅश : विमान पोखराहून जोमसोमला जात होते. लँडिंगच्या काही वेळापूर्वीच विमान अपघाताला बळी पडले. त्यात 21 लोक होते. 15 मरण पावले. हा अपघात 2012 चा आहे.
- बुद्ध एअर फ्लाइट 103 : या विमान अपघातात 10 भारतीयांचाही मृत्यू झाला होता. यात एकूण 22 लोक होते. सर्वजण मरण पावले. हा अपघात सप्टेंबर 2011 चा आहे.
- तारा ट्विन ऑटर घटना : या अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात डिसेंबर 2010 चा आहे.