जेरुसलेम - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि वैकल्पिक पंतप्रधान बेनी गॅन्ट्झ यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वृत्तसंस्था सिन्हुआच्या वृत्तानुसार, दोन्ही नेत्यांच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या वेळी संपूर्ण शिक्षण व्यवस्था बंद केली जाईल. याव्यतिरिक्त, बहुतेक समारंभांवरदेखील बंदी घातली जाईल.
आरोग्य मंत्रालयाने सर्व दुकाने आणि व्यवसाय सायंकाळी 7 वाजल्यापासून दुसर्या दिवशी सकाळपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या सर्व निर्बंधांना मान्यता देण्यासाठी मंत्रीमंडळाची बैठक मंगळवारी बोलावली होती.
हेही वाचा - लेबेनॉनमध्ये 25 दिवस पूर्ण लॉकडाउन
दरम्यान, अद्याप लॉकडाऊन किती कालावधीसाठी असेल हे निश्चित झालेले नाही. गॅन्ट्झ यांनी 10 ते 14 दिवस लॉकडाऊन करण्यास सांगितले आहे. तर, नेतान्याहू यांनी महामारी कमी होईपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यास सांगितले आहे.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत नेतान्याहू म्हणाले की, कोविड-19 चे म्यूटेशन होऊन तयार झालेला नवीन विषाणू 'नियंत्रणातून बाहेर गेला आहे.'
27 डिसेंबर 2020 रोजी इस्रायलमध्ये देशभरात तिसरा लॉकडाऊन लागू केला गेला. मंगळवारी सकाळपर्यंत येथे 4 लाख 51 हजार 44 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत 3 हजार 448 मृत्यू झाले आहेत.
हेही वाचा - रशियामध्ये 24 तासांत कोविड -19 चे 23 चे 23 हजार 351 नवे रुग्ण