तेल-अवीव (इस्राईल): संशोधकांना कोरोना विषाणूचा रेणू (मॉलेक्युल) शोधण्यात यश आले असून यामुळे विषाणूविरोधातील लस विकसित करण्यात मदत होणार आहे असे इस्राईलमधील बार इलान युनिव्हर्सिटीने (बीआययू) म्हटले आहे.
गुरुवारी एमडीपीआय व्हॅक्सीन्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, बीआययू संशोधकांनी प्रतिपिंडांमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करण्यात कारणीभूत असलेल्या अँटीजन रेणूंची तपासणी केली आहे.
संशोधकांच्या टीमने विषाणूच्या प्रथिन संचामध्ये संभाव्य एपिटोप आणि अँटीजन रेणूंमधील प्रथिनांचा भाग शोधून काढले.
हे एपिटोप अँटीबॉडी आणि प्रतिकारक शक्ती निर्माण करणाऱ्या पेशी (सेल मेडिएटेड इम्यून रिस्पॉन्स) निर्माण करू शकतात.
विषाणूमधील प्रथिनांचा अभ्यास करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्तीचा नाश करत असलेले विषाणूमधील एपिटोप शोधण्यासाठी संशोधकांनी बायोइन्फॉरमॅटिक्स-आधारित संगणकीय दृष्टिकोन स्वीकारला होता.
संशोधकांनी विषाणूंच्या तीन प्रथिनांमधील रोगप्रतिकारक शक्तीचा प्रतिकार करू शकणाऱ्या १५ संभाव्य भागांचा शोध घेतला असून इतर २५ एपीटोप देखील शोधून काढले आहेत.
संशोधकांच्या मते, जगभरातील एकूण विषाणू पीडित लोकसंख्येच्या ८७ टक्के लोकसंख्येमध्ये ७ एपिटोप वास्तव्य करतात.
या सात एपिटोपची चाचणी घेण्यासाठी 'नॉन-अॅलर्जेनिक आणि नॉन-टॉक्सिक नेचर'च्या एकापेक्षा अधिक साधनांचा वापर करण्यात आला. तसेच, या एपिटॉपमुळे ऑटोइम्युन प्रतिसाद कार्यरत होण्याची शक्यता देखील खूप कमी आहे हे देखील तपासण्यात आले.
संशोधक चमूच्या मते, छोट्या प्रथिनांचा वापर करून पेप्टाईड आधारित लस विकसित करण्यासाठी हे सात एपिटोप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
हेही वाचा : 'कोरोनावर लस शोधल्याचा पतंजलीने केला दावा'