काबूल - दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार प्रांतात बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. खासगी बस एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असताना रस्त्याच्या बाजूला शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. त्यामुळे बसमधील 9 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले, अशी माहिती कंदाहार प्रांताच्या सरकारी प्रवक्त्याने दिली.
बसमधली सगळे सर्वसामान्य नागरिक होते. रमझान सनानिमित्त तालिबान सोबत शस्त्रसंधी केल्यानंतर तिसऱ्यांदा बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. या तिन्ही हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली नाही. मात्र, अफगाणिस्तानच्या लष्करावर केलेल्या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे. तालिबान आणि अफगाण लष्कर दोघांमधील चकमकी थांबवण्याची चिन्हे दिसून येत नाहीत.